TIMES OF AHMEDNAGAR.
बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ५ मे २०२२ ला मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली होती. संकेत घरून नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी गणवेश परिधान करतांना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. त्यामुळे त्या गडबडीत रिव्हॉल्वर डाव्या बाजूला खाली पडून त्यातील गोळी झाडल्या गेली. ती गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरीमध्ये जाऊन फसल्याचा संकेतचा दावा होता.
स्त्रोत. सोशल मिडिया.
गोळीबार कांडात दोघे सहभागी.
वाहन निरीक्षक संकेत गायकवाड याच्यावर गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न करणारी सहकारी गीता शेजवळ हिच्या शोधासाठी नागपूर गुन्हे शाखेचे विशेष पथक अहमदनगरला रवाना झाले आहे. नागपूर गुन्हे शाखेचे विशेष पथक गीता शेजवळ यांच्या घराची झडती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संकेत आणि गीता या दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याने गोळीबार कांडात दोघेही आरोपी आहेत.