विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्या मुस्लीम कुटुंबाचे पाय धुतले. त्या मुस्लीम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला आणि म्हणाले राम …..
TIMES OF AHMEDNAGAR | RAM MANDIR | AYODHYA | AYYUB CONVERTED TO HINDUISM | VISHWA HINDU PARISHAD || THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. २२ जानेवारीच्या ऐतिहासिक दिवशी समारंभपूर्वक अय्यूबच्या कुटुंबाचा हिंदू धर्म प्रवेश देखील झाला.हिंदू धर्मात प्रवेश केल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने त्यांचे पाय धून स्वागत करण्यात आले होते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून राम भक्तांना दर्शन मिळेल. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या दर्शन पूजनासाठी नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार आधी सुरु होतं, त्या प्रमाणेच पाचवेळा आरती होईल. याची सुरुवात पहाटे ४ वाजल्यापासून श्रृंगार आरतीने होईल. संध्याकाळी ७ वाजता संध्या आरती होईल. याच प्रकारे रात्री १० वाजता शयन आरतीनंतर मंदिराचे दरवाजे बंद होतील. भक्तांसाठी रामललाचा दरबार सकाळी ८ वाजता सुरु होईल. त्यानंतर भक्तगण पूर्ण श्रद्धेने आपल्या आराध्यच दर्शन घेऊ शकतील. ट्रस्टने जारी केलेल्या निर्देशानुसार, आज दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत रामललांचे दर्शन बंद राहणार आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रामलल्लाची मध्यान्ह भोग आरती होईल. त्यासाठी दरवाजे बंद होतील. या दरम्यान रामलल्लाच्या दर्शन पूजनासाठी राम मंदिर परिसरात सकाळी ३ वाजल्यापासून भक्त जमायला सुरुवात झाली आहे. राम मंदिराच काल उद्घाटन झालं. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अगदी चेंगराचेंगरी सारखी स्थिती आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धुतले मुस्लीम कुटुंबाचे पाय.!
आय्युबच्या कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आय्युबाचे व त्यांच्या कुटुंबियांचे पाय धुतले व अंगवस्त्र घालून हिंदू धर्मात स्वागत केलं. अय्यूब आता राजकुमार आणि त्याची पत्नी करिश्मा या नावाने ओळखली जाईल.
अय्यूबने आदिवासी युवती करिश्मासोबत निकाह केला होता. मुस्लिम अय्यूबने पत्नीसोबत राहून हिंदू धर्म आणि पूजा पद्धती समजून घेतली. त्यानंतर प्रभावित होऊन विश्व हिंदू परिषदेशी संपर्क साधला. विधी विधानासह त्याने कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला.
स्त्रोत.सोशल मिडिया.
आमचे पूर्वज हिंदू होते…..
अयोध्येतील राम मंदिरात काल प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. भव्य राम मंदिर आजपासून भक्तांसाठी खुल झालं आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हिंदू धर्मात घरवापसी सुद्धा झाली. काल देशात मंगल वातावरण होतं. जय श्रीरामच्या घोषणेने देश दुमदुमला. याचवेळी मध्य प्रदेशच्या अलीराजपुरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच हिंदू धर्मात प्रवेश केला. अय्यूब ऊर्फ पीरू भाईने पत्नी आणि दोन मुलांसह हिंदू धर्मात प्रवेश केला. आमचे पूर्वज हिंदू होते, आता आम्ही घरवापसी करतोय, असं अय्यूब खानने सांगितलं. हिंदू धर्म आणि त्यातल्या पूचा अर्चा आपल्याला आवडतात असं अय्यूबने सांगितलं.