भाजप खासदाराच्या मुलाच्या कारने दोन तरुणांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी…..
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | UTTAR PRADESH | KESARGANJ LOK SABHA ELECTION | BJP MP BRAJBHUSHAN SHARAN SINGH | KARAN BHUSHAN SINGH | BHUSHAN SINGH'S CONVOY HIT A CAR, KILLING TWO CHILDREN ON THE SPOT AND 1 INJURED | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याच्या कारने तीन महाविद्यालयीन तरुणांना चिरडले आहे. यातील दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
करण भूषण यांनी त्या मुलांना खाली उतरून बघितले सुद्धा नाही.
करण भूषण सिंह हे भाजपचे विद्यमान खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ते कैसरगंज येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. बुधवारी करण भूषण सिंह यांचा ताफा जिल्ह्यातील कोतवाली भागातील कर्नलगंज रस्त्यावरून हुजूरपूरकडे जात होता. बैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ ताफा आला असता तीन महाविद्यालयीन तरुण रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी ताफ्यातील कारने या तरुणांना जबर धडक दिली होती. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी करण भूषण यांचा ताफा तिथे थांबला नाही. करण भूषण यांनी स्वतः खाली उतरून मुलांची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हा ताफा मुलांना तुडवत गेला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिकांनी तरुणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र यातील दोन तरुणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव…
तिसऱ्या तरुणावर उपचार सुरू असून त्याची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे. सध्या घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून रास्ता रोको आंदोलनाची तयारी करीत आहेत.