पहलगाम हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानचे संबंध आता भयंकर ताणले जात आहे. दोन्ही देशांचे नेतेमंडळी एकमेकांविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा आम्ही बदला घेऊ असं थेटपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात काही कठोर निर्णय देखील घेतले आहेत. दुसरीकडे भारताने आपली सेना युद्धासाठी सज्ज केली आहे. असे असतानाच आता पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी भारतासोबतच्या युद्धाची थेट तारीखच सांगितली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
(संग्रहित दृश्य.)
सिंधू नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय म्हणजे युद्ध छेडण्याचीच भाषा.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी भातीयांकडून केली जात आहे. आम्ही सरकार सोबत आहोत, सरकारने कठोर निर्णय घ्यावेत अशी भूमिका असल्याची सर्वच राजकीय पक्षांनीदेखील घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकार नेमकं काय करणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधूनही पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. सिंधू नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय म्हणजे युद्ध छेडण्याचीच भाषा आहे, असा थयथयाट पाकिस्तानने केला आहे. भारताने युद्ध छेडलच तर आम्ही प्रत्युत्तर देऊ अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी दोन्ही देशांतील युद्धाबाबत भाकित वर्तवलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढच्या चार दिवसांत युद्ध होऊ शकतं, असं ख्वाजा असिफ यांनी म्हटलंय. ख्वाजा असिफ यांचं हे विधान म्हणजे त्यांनी एका प्रकारे भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाची तारीखच सांगून टाकली आहे, असं बोललं जातंय. दरम्यान, पाकिस्तानकडून युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. असे असले तरी पाकिस्तानने कोणतीही कृती केली तर भारतीय सेना त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहेत. भारताचे तिन्ही दल पूर्ण तयारीनिशी सराव करत आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.