Reading:छ.संभाजी महाराजांची औरंगजेबानं हत्या केली,तर शाहूं महाराजांना औरंगजेबाच्या मुलानं मुक्त केल….पण त्यानंतर महाराणी येसूबाई अन् त्यांच्या मुलाचं काय केलं ?
छ.संभाजी महाराजांची औरंगजेबानं हत्या केली,तर शाहूं महाराजांना औरंगजेबाच्या मुलानं मुक्त केल….पण त्यानंतर महाराणी येसूबाई अन् त्यांच्या मुलाचं काय केलं ?
CHAVA MOVIE / SAMBHAJI MAHARAJ / VICKY KAUSHAL : निर्माते लक्ष्मण उतेकर यांच्या बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. सध्या छावाने देशभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं केवळ चारच दिवसांत आपलं १३० कोटींचं बजेट वसूल केलं आहे. तर, लवकरच ‘छावा’ ५०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. छावा चित्रपटान रिलीज होताच अनेक दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, त्यांची शौर्य, पराक्रम आणि त्याग, मांडण्यात निर्मात्यांना यश आले आहे.छावामधला क्लायमॅक्स पाहून तर डोळ्याच्या कडा पाणावतात आणि आपला राजा किती पराक्रमी होता, याची जाणीवर करुन देतो.
छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुघलांनी त्यांना बंदी करुन त्यांचे हालहाल करुन मारलं. औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी रायगडावर जाताच, संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंनी राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवलं आणि मराठ्यांचे छत्रपती म्हणून घोषित केलं. पण, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शहाजी यांचं काय झालं ? औरंगजेबानं काय केलं ? अशे अनेक प्रश्न छावा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना पडत आहेत.
(संग्रहित दृश्य.)
शाहूं महाराजांना औरंगजेबाच्या मुलान मुक्त केल…….
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर मराठी साम्राज्याविरोधात मोठी खेळी रचली होती. औरंगजेबाचं एकच स्वप्न होतं… ते म्हणजे, मराठा साम्राज्याचा अंत करणे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १२ मार्च १६८९ साली त्यांचे धाकटे बंधू राजाराम यांना छत्रपती म्हणून घोषित करण्यात आलं. संभाजी महाराजांच्या मृत्युमुळे आणि त्यांचा धाकटा सावत्र भाऊ राजाराम पहिला यानं गादी स्वीकारल्यानं आधीच मराठा राज्य अस्थिर झालं होत. त्यानंतर १३ दिवसांनी म्हणजेच २५ मार्च १६८९ रोजी मुघल सैन्यानं रायगड किल्ल्यावर हल्ला केला. स्वराज्याची राजधानी असलेला रायगडचा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. छत्रपती संभाजी राजेंच्या पत्नी महाराणी येसूबाई, शिवाजी महाराजांच्या आई सकवरबाई आणि शंभू महाराजांचे पुत्र शहाजी यांना मुघलांनी कैद केलं.
(संग्रहित दृश्य.)
छ.संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची सुत्रं पेशव्यांच्या हाती….
राजारामांनी मराठ्यांची राजधानी दक्षिणेला जिंजीला हलवली, तर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील मराठा गनिमी कारागिरांनी मुघल सैन्यासोबतची झुंज सुरूच ठेवली. ज्यावेळी शाहू महाराजांना मुघलांनी अटक केली, त्यावेळी ते अवघ्या ०७ वर्षांचे होते. फेब्रुवारी १६८९ पासून १७०७ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत १८ वर्ष शाहू महाराज मुघलांच्या कैदेत राहिले. त्यानंतर शाहूं महाराजांना औरंगजेबाचा मुलगा सम्राट मुहम्मद आझम शाह यानं मुक्त केलं. त्यामागे मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचंच कपट मुघलांच्या मनात होतं. शाहू महाराजांनी सुटकेनंतर त्यांची काकी महाराणी ताराबाई (राजाराम महाराजांच्या पत्नी) यांच्याशी युद्ध करावं लागलं. छत्रपतींच्या गादीसाठी शाहू महाराजांनी आणि ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी दुसरा याच्यासाठी दावा केला होता. दोघांमध्ये युद्ध झालं. शाहूंची अटीशर्थींसह सुटका करण्यात आली होती. तसेच, शाहू महाराजांनी त्यांच्या सुटकेच्या अटींचे पालन करावं, यासाठी मुघलांनी येसूबाईंना बंदिवान ठेवलं. १७१९ मध्ये शाहू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठे बळकट झाले तेव्हा येसूबाईंची सुटका करण्यात आली. दरम्यान, मधल्या काळातल्या बऱ्याच घडामोडींनंतर मराठा साम्राज्याची सुत्रं पेशव्यांच्या हाती गेली. त्यापूर्वीच १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला होता.