इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला असून केडगावचे रहिवासी अल्ताफ शेख यांचा मुलगा चिरंजीव साकिब अल्ताफ शेख याला ९१.८० इतके टक्के मिळालेले असून केडगावमध्ये त्याचे कौतुक करण्यात येत आहे. अल्ताफ शेख यांची केडगाव परिसरात पिठाची गिरणी आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे केडगावमध्ये घनिष्ठ संबंध आहे. त्यांचा मुलगा साकिब अल्ताफ शेख हा यावर्षी झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१.८० गुणांनी उत्तीर्ण झाला साकिब हा अंबिका विद्यालयात शिक्षण घेते होता. साकिबने घेतलेल्या अथक परिश्रमाचे व परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या गुणांचे अंबिका महाविद्यालयातील शिक्षकांनी तसेच वडील अल्ताफ शेख, आई जबीन शेख, आजोबा मुश्ताक शेख, आजी शमीम शेख, शाकीबचे मामा दिव्यांग संघटनेचे फिरोझ शेख आदिनी त्याचे कौतुक करत साकिबला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.