TIMES OF AHMEDNAGAR
विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) विधानसभा मतदारसंघात देखील मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (उबाठा) व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत फुट पडली आहे. तर महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. आमदार जगताप हे नगर विकास यात्रेच्या माध्यमातून रोज एका परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. ह्या विकासयात्रेच्या प्रत्येक टप्प्यात एकच सातत्यानं पाहायला आणि ऐकायला मिळतंय.नगरमध्ये जोरदार विकासकामं होत असल्यानं नागरिक खूश आहेत. विकासयात्रेची ही गती कायम ठेवण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. तो निर्धार ते स्पष्टपणे बोलून दाखवतात असे आमदार जगताप यांनी व्यक्त केले आहे.
चाणक्य चौकातून रविवारी नगर विकास यात्रेला सुरुवात झाली. चौक, आसपासचा परिसर, सोसायट्या, बुरूडगाव रस्ता ह्या सर्व ठिकाणी नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांचे आपुलकीने स्वागत केले. शहरात सध्या सुरु असलेल्या विविध कामांबाबत वाटणारं समाधान त्यांनी बोलून दाखवलं. ह्याच विकासयात्रेचे वारकरी होण्यात त्यांना आनंद असल्याचे आमदार जगताप म्हणाले. ठिकठिकाणी महिलांनी, बहिणींनी औक्षण केलं. भाऊबीज असल्याने ह्या औक्षणामध्ये अधिकच माया ममता होती. मावशी, आजी ह्यांच्या पाया पडून दर्शन घेतलं. त्यांनी डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवत भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे आमदार जगताप यांनी व्यक्त केले. या विकासयात्रेत माजी महापौर गणेश भोसले, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.