अहिल्यानगर ; पिंपळगाव लांडगा (ता. अहिल्यानगर) येथील ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी सूर्यभान सावळेराम लांडगे (वय ८४) यांचे मंगळवारी (दि. ४) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष व दै. लोकआवाजचे मालक-संपादक विठ्ठलराव लांडगे, जिल्हा ऑडिटर संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग लांडगे यांचे वडील तसेच अहिल्यानगर इलेक्ट्रीकल डिलर्स असोशिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब परभणे यांचे ते सासरे होते. पिंपळगाव लांडगा आणि परिसरात सूर्यभान लांडगे यांचा समाजिक आणि धार्मिक कामात सहभाग होता. अनेक वर्षे त्यांनी पंढरपूर वारी दर्शन नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. सुरवातीच्या काळात प्रतीकुल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी यशस्वी कुटूंब घडवले. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.
(संग्रहित दृश्य.)
लांडगे कुटुंबच मनमिळावू…..
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी सूर्यभान लांडगे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. अनेक सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा विशेष सहभाग असायचा, गावात हवेहवेसे वाटणार व्यक्तिमत्व आज अचानक आपल्यातून गेल्याने हे नुकसान न भरून येणारं असल्याचे दु:ख गावकऱ्यांनी व्यक्त केल. सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान लांडगे यांच्याच पावलावर पाउल देत विठ्ठलराव लांडगे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम हाती घेतले. विठ्ठलराव लांडगे यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना अहमदनगर प्रेस क्लबची अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पत्रकारितेत काम करत असतांना देखील कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता त्यांनी सामाजिक कार्यात देखील आपले योगदान दिले आहे. त्यांनी गोरगरीबांसाठी सतत स्वखर्चातून योगदान दिले आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे अशी इच्छा असलेलं लांडगे कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे.