By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: आलमगीर येथील त्या मुस्लिम धर्मगुरूंच्या मृत्युचा तपास करून शिक्षक आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > आलमगीर येथील त्या मुस्लिम धर्मगुरूंच्या मृत्युचा तपास करून शिक्षक आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
अहमदनगर

आलमगीर येथील त्या मुस्लिम धर्मगुरूंच्या मृत्युचा तपास करून शिक्षक आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | ALAMGIR | BHINGAR CAMP POLICE STATION | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE, AHMEDNAGAR | MUSLIM CLERIC SHOHEB SHEIKH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/29 at 12:13 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर शहरामध्ये बेशिस्त कामकाजाचे प्रमाण वाढतच चालले आहे. कधी कामगारांवर आर्थीक अत्याचार तर कधी कामगारांना डांबून मारण्याचे प्रकार घडतच आहेत. कामगारांनी अनावधानाने मालकाला काही उलट उत्तर दिले तर मग त्या कामगाराची खैर नाही. काही ठिकाणी तर कामगारांचा थेट खून देखील होतो अशा अनेक घटना घडलेल्या ऐकायला मिळतात.मात्र कामगारांच्या हितासाठी शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातात.बांधकाम करणाऱ्या मजुरांना सेफ्टी बेल्ट,हेलमेट,सारख्या गोष्टी तर कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना जेवणाची देखील काळजी शासन घेत असते मात्र स्थानिक पातळीवरील संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने चिंता व्यक्त केली जात असते.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू! - Marathi News | Youth dies of electric  shock! | Latest buldhana News at Lokmat.com(संग्रहित.स्त्रोत.सोशल मिडिया.)

मुस्लिम धर्मगुरूंच्या मृत्यूचे गूढ कायम. 

आलमगीर येथे १३ मे रोजी एका शिक्षकाच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नाच्या नियोजनासाठी शहरातील एका खासगी ठेकेदाराला नियोजनाची जबाबदारी देण्यात आली होती. कामाचे पैसे मिळणार म्हणून कामावर भर देणाऱ्या त्या ठेकेदारामुळे एका निष्पाप धर्मगुरूचा मृत्यू झाला आहे. एखादा कामगार काम करत असतांना त्या कामगाराची जबाबदारी हि संबंधित संचालक अथवा मालक यांची असते. आपल्यकडे काम करणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देणे तो काम करत असतांना त्याला कोणतीही अडचण येणार नाही,काम करत असतांना त्याच्या जीवाचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी संबंधित मालकाची असते. मात्र आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असल्याचे  कदाचित दोन पैशांच्या लालचेपोटी काही ठेकेदार विसरत असतील. 

सदोष मनुष्य वधप्रकरणी एकाला 10 वर्षे सक्तमजुरी; जिल्हा व सत्र न्यायालय  जालना यांचा महत्वपूर्ण निकाल | Saamana (सामना)(संग्रहित.स्त्रोत.सोशल मिडिया.)

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रिन्स टावर शेजारी एका शिक्षकाच्या मुलीचा विवाह होता. त्या विवाह सोहळ्याच्या निमित्त आलमगीर या ठिकाणी (दि. १३ मे ) रोजी एका मंडप डेकोरेटर्सचे काम करत असतांना मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हाफिज शोहेब शेख साहेब यांचा मृत्यू झाला होता. एका खासगी मंडपवाल्याकडे काम करत असतांना त्यांचा मृत्यू झाल्याचे बनाव होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मात्र हाफिज शोहेब शेख साहेब यांचा घातपात झाल्याचे एकंदरीत समोर येत आहे.करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा बनाव संबंधितांकडून करण्यात आला आहे असे समजते. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करून संबंधितांची चौकशी करावी. मुस्लिम धर्मगुरू  यांचा मृत्यू नेमका का आणि कसा झाला याचे कोडे अद्यापही उलगडले नाही. तरी आपण या घटनेची सखोल चौकशी करून धर्मगुरू यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांची चौकशी करून शिक्षक आणि मंडप चालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व सहा.कामगार आयुक्त यांना देलेल्या निवेदनात म्हटले आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad3
Happy0
Sleepy0
Angry0
Dead3
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आता भुईकोट किल्ला होणार चकाचक……..
Next Article महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार, राजकारणाला नवीन वळण ?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?