देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचा भीषण अपघात, एक ठार तर सात गंभीर जखमी…..
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | SHIRDI | THE DEVOTEES WHO WENT TO DEVDARSHAN HAVE MET WITH A TERRIBLE ACCIDENT | ONE PERSON WAS KILLED AND SEVEN PEOPLE WERE INJURED IN THE ACCIDENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
शिर्डी येथे साईबाबाचे दर्शनानंतर ओडिसा येथील भाविकांना शिंगणापूर येथे शनिदर्शनाला जाणारी भरधाव इंडीगा कार मोटरसायकलवर जावून आदळल्याने एक ठार, तर सात जखमी झाले आहेत. अपघातानंतर इंडिगा कारने तीन वेळा पलटी मारली आहे. मात्र लहान मुलांसह भाविक सुदैवाने बचावले आहेत. जखमींपैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. आणि दुचाकीचालक रंगनाथ गंगाधर आरंगळे (वय ६१, रा. आरंगळे वस्ती, राहुरी फॅक्टरी) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. दुचाकीवर मागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे (रा राहुरी फॅक्टरी) व कारमधील ओरिसा राज्यातील सुश्मिता संतोष पुष्टी (वय ४६) गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर राहुरी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. इंडीगा एम. एच. २० एफ. जी. ७०२७ क्रमांकाची कार ७ भाविकांना घेऊन शिर्डीकडे जात होती. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता.
स्त्रोत सोशल मिडिया
भाविकांना घेऊन शिर्डीकडे घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात….
गुहा हद्दीतील सेल पंपाजवळ येताच इंडीगा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेचे दुभाजक तोडून कार मोटरसायकलला जावून धडकली आहे. कारने तब्बल तीन पलट्या खाल्ल्याने भाविक कारमध्ये दबले गेले होते. या भाविकांनी आरडाओरड केल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन धारकांनी घटनास्थळी धाव घेऊन कारचे दरवाजे तोडून भाविकांना बाहेर काढले आहे. ठार झालेले रंगनाथ अरांगळे हे मोटरसायकलवर बुधवारी लोणी येथे भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात जात होते. राहुरी फॅक्टरी येथील घरापासून दोन किलोमीटर अंतरावर जाताच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. अपघातस्थळी एकेरी वाहतुकीमुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेले आहेत. अनेक जणांना अपंगत्व आले आहे. एकेरी वाहतुकीने आणखी एकाचा बळी घेतला आहे.