अहमदनगर : दोन समाजामध्ये स्वास्थ बिघडवणारे वक्तव्य करणार्या व्यक्तींवर पोलीस स्वतःहून कारवाई करत आहे. यापुढे कुणी असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस पुढाकार घेऊन तेढ निर्माण करणार्यावर कठोर कारवाई करतील, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. येणारे सर्वच सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ओला यांनी केले.