डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा मंत्रिपदाचा राजीनामा केंद्रशासनाच्या दप्तरातून गहाळ झाल्याची धक्कादायक बातमी.
RTI मधून धक्कादायक माहिती उघड झाली.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदा मंत्रिपदाच्या दिलेल्या राजीनाम्याची मूळ प्रत केंद्राच्या शासकीय दप्तरातून गहाळ झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत ढसाळ यांनी केलेल्या अर्जावर केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त वाय. के. सिन्हा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.