By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मोबाईलवरुन भांडण झाले म्हणून पत्नीने पतीला बेशुद्ध करून दिला विजेचा शॉक आणि मुलाच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने हल्ला….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > देश-विदेश > मोबाईलवरुन भांडण झाले म्हणून पत्नीने पतीला बेशुद्ध करून दिला विजेचा शॉक आणि मुलाच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने हल्ला….
देश-विदेश

मोबाईलवरुन भांडण झाले म्हणून पत्नीने पतीला बेशुद्ध करून दिला विजेचा शॉक आणि मुलाच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने हल्ला….

TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | UTTAR PRADESH | MAINPURI | WIFE BEATS UP HUSBAND AND CHILD | AS HUSBAND GRABS MOBILE PHONE ELECTRIC SHOCK GIVEN TO HUSBAND | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/01 at 6:48 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

मोबाइलचे व्यसन ही जगभरातील एक चिंताजनक समस्या बनत चालली आहे. लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाइलवर सर्वाधिक वेळ घालवतात. या मोबाइलमुळेच अनेकदा घरात वाद होतात, नातेसंबंध बिघडतात. पण, या मोबाइलच्या आहारी जाऊन लोक किती धोकादायक पाऊल उचलू शकतात हे दाखवणारी एक घटना सध्या समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये पतीने हातातील मोबाइल हिसकावून घेतल्याने पत्नीला राग आला, यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीला इलेक्ट्रिक शॉक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नाही तर क्रिकेटच्या बॅटने पती आणि मुलाच्या डोक्यावर हल्ला केला आहे. या घटनेप्रकरणी पीडित पतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Astrology Upay: इन ग्रहों की युति करवाती है पति-पत्नी में झगड़ा, ये उपाय  करेंगे तो परिवार में रहेगी शांति - Astrology Upay The conjunction of these  planets causes fights between ...स्त्रोत सोशल मिडिया 

दोघांमध्ये मोबाइलवरून अनेकदा वाद…

पतीचा दावा आहे की, पत्नी मोबाइलवर जास्त वेळ घालवते. एकदिवस अशीच ती मोबाइलवर होती, त्यावेळी पतीने तिच्या हातून मोबाइल हिसकावला, ज्यावर संतापलेल्या पत्नीने पतीला बेशुद्ध केले आणि त्याला बेडवर बांधले. यानंतर मारहाण करून विजेचे शॉक दिले. घटनेवेळी १४ वर्षांच्या त्यांच्या मुलाने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पती प्रदीप सिंह यांच्यावर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हे प्रकरण किसनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पदमपूर गावातील आहे. येथे प्रदीप कुमार नावाचा व्यक्ती पत्नी बेबी यादवबरोबर राहतो. दोघांच्या लग्नाला जवळपास १७ वर्षे झाली आहेत. त्यांना १४ वर्षांचा मुलगाही आहे. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये मोबाइलवरून अनेकदा वाद होत होते.

crime : बायकोला आला राग अन् पतीला दिला विजेचा शॉक, नंतर 2 दिवस घरात घडलं  भयंकर – News18 मराठीस्त्रोत सोशल मिडिया

बेशुद्ध पडलेल्या पतीला विजेचा शॉक दिला.

प्रदीपने फिर्यादीत आरोप केला आहे की, त्याची पत्नी रोज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीशी फोनवर बोलत असे. प्रदीपने यावर आक्षेप घेत तिचे आई-वडील आणि भावाला ही गोष्ट सांगितली होती. यानंतर पत्नीचा मोबाइल तिच्याकडून काढून घेतला. १८ मे रोजी अशाचप्रकारे मोबाईलवरुन भांडण झाले. या गोष्टीवरून संतापलेल्या पत्नीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच जेवणात मादक पदार्थ मिसळून पतीला बेशुद्ध केले. पत्नी इतक्यावरच थांबली नाही तिने बेशुद्ध पडलेल्या पतीला विजेचा शॉक दिला. तसेच त्याच्यावर क्रिकेट बॅटने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित पतीच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. यावेळी मुलाने मध्यस्ती करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीने मुलावरही हल्ला केला. या हल्ल्यात प्रदीप गंभीर जखमी झाला आहे. पीडित पतीच्या तक्रारीच्या आधारे, पत्नी बेबी विरुद्ध आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३२८ (विष किंवा कोणतेही हानिकारक पदार्थ देऊन दुखापत करणे) आणि ५०६ (धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आता पुढील तपास सुरू केला आहे.

You Might Also Like

एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय १७१ हे विमान कोसळलं ; विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला आई ढसाढसा रडत म्हणाली…..

चक्क दात घासण्याच्या ब्रशमुळे पतीचं लफडं उघड ; दर शुक्रवारी प्रेयसी घरी घेऊन…

चार विवाहित मुलांची आई सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार…..

….तर बलात्काराचा खटला करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. !

मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवले जाणार मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा ; यापूर्वी हिंदू महाकाव्ये, महाभारत आणि रामायण शिकवण्याची केली होती मागणी…….

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मी ‘आयटीआय’चा फिटर आहे. कोणता पान्हा कसा लावायचा याचा खटका मला चांगलाच माहीत आहे,अशा विविध प्रकारचे निलेश लंके यांचे वक्तव्य.
Next Article नगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्याच्या उद्देशाने अजित पवार यांच्याकडून ही खेळी खेळली जाणार…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?