धोतर सुटणार त्या प्रकरणाला वेगळे वळण येणार ?
त्या हद्दीचे पोलीस निरीक्षक अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतात. आलेल्या तक्रारदाराचे पूर्णपणे समाधान होईपर्यंत तक्रारदाराची तक्रार ऐकून घेऊन दिलासादायक कारवाई करण्यात ते पोलीस निरीक्षक यशस्वी असल्याचे समजते. आपल्या हद्दीतील शाळा,विद्यालये,महाविद्यालयांमध्ये महिला सक्षमिकणासाठी विद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन,रोड रोमियो यांच्यावर निर्भीडपणे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करणारा आमचा पोलीस दादा आहे असे विद्यार्थिनी सांगतात.
काही दिवसांपूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींवरून पोलीस निरीक्षकांनी अतिक्रम काढून बेकायदेशीर कामकाजाला वाचा फोडला खरा,परंतु काही बहाद्दूर दिवे हे काही अवैध धंद्यांना आपला प्रकश देत असल्याचे समजते.निरीक्षकांच्या चांगुलपणाला प्रसारमाध्यमांचा प्रकाश असला तरी,अवैध धंद्यांना मात्र दिवेच प्रकाश देत असल्याचे प्राथमिक माहिती आहे.
अवैध धंद्यांना दिव्यांचा प्रकाश जरी असला तरी,तो थेट नाहीच श्री. गणेशाच्या आडून हा प्रकाश पडत आहे. प्रकाश देणारा दिवा हा जरी मजबूत असला तरी तो प्रकाशझोतात येणे टाळत असतो.गणेशाच्या ताकदीमुळे दिव्यांचा अवैध धंद्यांवर जास्त प्रकाश पडत आहे. अनेक गुन्हेबाहादुर्रांना अदृश्य आशीर्वाद देऊन गणेशाच्या ताकदीने दिवे लक्ष्मीदर्शन करत असल्याचे समजते. अवैध धंद्यांना हद्दीत आपला प्रकश देऊन काय सिद्ध करायचं आहे ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अवैध धंदे वेश्या व्यवसाय,जुगार,मटका,अनधिकृत दारू विक्री,गोमांस तस्करी,अमली पदार्थांचे सेवन,सुगंधित तंबाखू,गुटखा विक्री,अशा धंद्यांची मोठी उलाढाल अहमदनगर जिल्ह्यासह शहरात देखील होत आहे.