Reading:नवरात्रीचे उपवास करणाऱ्या महिलेला थेट नॉन व्हेज बिर्याणी ? दोन चमचे बिर्याणी खाल्ली तेव्हा तिच्या लक्षात आले कि व्हेज ऐवजी मिळाली नॉन व्हेज बिर्याणी…..
नवरात्रीचे उपवास करणाऱ्या महिलेला थेट नॉन व्हेज बिर्याणी ? दोन चमचे बिर्याणी खाल्ली तेव्हा तिच्या लक्षात आले कि व्हेज ऐवजी मिळाली नॉन व्हेज बिर्याणी…..
ग्रेटर नोएडा वेस्टमधील एका रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. स्विगी अॅपवरून एका तरुणीने व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती पण तिला व्हेज बिर्याणी ऐवजी थेट चिकन बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली. विशेष म्हणजे महिला नवरात्रीचे उपवास करत होती. नवरात्रीच्या उपवासादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याने महिलेला धक्का बसला. महिलेने एक व्हिडिओ जारी केला आहे आणि स्विगी या ऑनलाइन साइटवर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये राहणाऱ्या छाया शर्मा या तरुणीने एक व्हिडिओ पोस्ट करून ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विगीवर गंभीर आरोप केले आहेत. नवरात्रीच्या दिवसांत तरुणीने व्हेज बिर्याणी खाण्यासाठी ऑर्डर केली होती. पण त्याऐवजी तिला चिकन बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली. तरुणीने जेव्हा दोन चमचे बिर्याणी खाल्ली तेव्हा तिच्या लक्षात आले.
(संग्रहित दृश्य.)
पोस्टमध्ये हिंदू, शाकाहारी, पंडित आणि घोटाळा असे हॅशटॅग…
नवरात्रीत नकळत चिकन बिर्याणी खाल्ल्याने एका तरुणीच्या भावना दुखावल्या आहेत. याबद्दल, तिने स्वतःचा रडत रडत व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणीने सांगितले की, तिने बिसरख येथे सेक्टर २, येछील आम्रपाली लेझर पार्क सोसायटीजवळील लखनऊ कबाब पराठां नावाच्या रेस्टॉरंटमधून व्हेज बिर्याणी खाण्यासाठी ऑर्डर केली होती पण तिला चिकन बिर्याणी देण्यात आली. छाया शर्मा नावाची ही तरुणी मांसाहारी बिर्याणी डिलिव्हर केलेली दाखवत म्हणते. मी यातून एक-दोन घासही खाल्ले आहेत, ती रडत रडत म्हणते की मी एक शुद्ध शाकाहारी मुलगी आहे. नवरात्रीच्या वेळी, त्यांनी हे जाणूनबुजून पाठवले आहे, असा तिचा आरोप आहे. जेव्हा रेस्टॉरंटला संपर्क साधून तिने तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणीही फोन उचलला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ४ एप्रिलचा असल्याचे सांगितले जात आहे. तरुणीने तिच्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने ४ एप्रिल रोजी रेस्टॉरंटमधून मुरादाबादी व्हेज बिर्याणी ऑर्डर केल्याचे दिसून येते. पोस्टमध्ये हिंदू, शाकाहारी, पंडित आणि घोटाळा असे हॅशटॅग आहेत.
(संग्रहित दृश्य)
महिलेचे कोणतेही निवेदन नाही….
द प्रिंटशी बोलताना, पोलिस उपायुक्त (मध्य नोएडा) शक्ती मोहन अवस्थी म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणाची माहिती देताना सेंट्रल नोएडाचे डीसीपी शक्ती मोहन अवस्थी म्हणाले की, सोशल मीडियावरून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका तरुणीने म्हटले आहे की तिने शाकाहारी जेवण ऑर्डर केले होते पण तिला मांसाहारी जेवण देण्यात आले. कारवाई करत पोलिसांनी रेस्टॉरंट चालकाला चौकशीसाठी बोलवले आहे आणि त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणताही प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आलेला नाही. डीसीपीने असेही म्हटले आहे की महिलेने कोणतेही निवेदन दिलेले नाही.
संग्रहित दृश्य
लखनऊ ‘कबाब’ पराठा नावाच्या रेस्टॉरंटला शुद्ध शाकाहारी चिन्हांकित…
त्या महिलेने असेही म्हटले आहे की, स्विगीवर रेस्टॉरंटला “शुद्ध शाकाहारी” म्हणून चिन्हांकित केले होते आणि म्हणूनच तिने तेथून व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती आणि नंतर तिने स्वतः त्या सुविधेला भेट दिली आणि तेथे मांसाहारी जेवण मिळत असल्याचे आढळले. तिने पुढे आरोप केला की,जेव्हा तिने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा तिला सांगण्यात आले की मॅनजरने विशिष्ट अन्न पॅक करण्याचा आदेश दिला होता. लखनऊ ‘कबाब’ पराठा नावाच्या रेस्टॉरंटला स्विगीवर शुद्ध शाकाहारी कसे चिन्हांकित केले जाते ? जर तसे असेल तर रेस्टॉरंटला शुद्ध शाकाहारी म्हणून चिन्हांकित केले तर ते आणखी संशयास्पद आहे ?