नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी प्रचाराला वेग दिला आहे. प्रभाग निहाय विकास यात्रा काढून ते मतदारांशी संवाद साधत आहेत. या प्रचारा दरम्यान आमदार संग्राम जगताप यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत होत आहे. कल्याण रोड परिसरात लोंढेमळा परिसरातील विविध भागांत, सोसायट्यांमध्ये नागरिकांनी पुष्पवृष्टी आणि महिलांनी औक्षण करून आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत केले आहे. यावेळी भावी मंत्री असं लिहिलेलं फलक जागोजागी नागरिकांनी लावले होते. आमदार संग्राम जगताप यांनी हॅटट्रिक साधल्यास आगामी सरकारमध्ये त्यांचे मंत्रीपद फिक्स असल्याचा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.