TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर – विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉ.बी.जी.शेखर पाटील यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली आहे. जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक व ठाणे शहर सह पोलिस आयुक्त म्हणून दत्तात्रय कराळेंनी कारभार पाहिला आहे. नाशिक परीक्षेत्राचा विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर कराळेंनी बुधवार दि.२१ फेब्रुवारी शहराचा दौरा केला.कराळेंना शहराचा चांगला अनुभव देखील आहे. कारण कराळेंनी यापूर्वी शहराचा कारभार संभाळला आहे. त्यामुळे नगरकरांच्या कराळेंकडून अपेक्षा वाढल्या आहेत.आलेल्या प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकून त्यांना त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत कराळेंचे नाव आवर्जून घेतले जाते.
महानिरीक्षकांनी नजर फिरवली ?
विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी अहमदनगरचा दौरा केला. एकेकाळी अहमदनगरचा कारभार संभाळला असल्यामुळे महानिरीक्षकांकडून नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. अहमदनगर शहरात अवैध धंद्यांचे साम्राज्य आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलगाम गुन्हेगारी वाढली आहे. खासगी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला,एका मजुराचा खून,दरोडे,अशा अनेक घटना तोफखाना हद्दीत वारंवार घडत आहेत. या हद्दीत अनेक अवैध धंद्यांचे साम्राज्य आहे या अवैध धंद्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करतात. या धंद्यांना बाबा जपेश्वर जपत असल्याची प्राथमिक माहिती आहे.