नेते दोषी असून देखील कलेक्टर कसे …, तानाशाहित चालते असे …..!
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR DISTRICT | AHMEDNAGAR CITY | DIRECTOR GENERAL OF POLICE | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | DISTRICT DEPUTY SUPERINTENDENT OF POLICE | KOTWALI POLICE STATION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – अहमदनगर शहरात खुनी हल्ल्याची मालिका सुरूच आहे. कधी वकिलावर हल्ला तर कधी वकिलाचा खून, तर कधी सरपंच महिलेवर प्राणघातक हल्ला, तर कधी तरुणांचा खून हि मालिका थांबण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. जर या मालिका थांबवायच्या असतील तर अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासनाला मजबूत करावे लागेल. जिल्हा प्रशासन मजबूत करण्यासाठी सर्वप्रथम प्रशासनात सक्षम अधिकाऱ्यांना नियुक्त करावे लागेल.
स्त्रोत.सोशल मिडिया.
गुन्हेगारी आवळण्यासाठी प्रशासनाच्या काय उपाययोजना ?
अहमदनगर शहरात गुन्हेगारी वाढली असल्याचे बोलले जाते. मात्र गुन्हेगारी व गुन्हेगारांना आवळण्यासाठी प्रशासनाच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याचे कळते. कारण प्रशासनातच बेधुंद बेकायदेशीर कारभार सुरु आहे. प्रशासनातील कर्मचारी खाकीच्या जोरावर सर्वसाधारण माणसाला धमकावत असतात. काही कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा जगजाहीर आहे. शहरातील एका पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी शहरात गाजलेल्या एका सोनेतारण प्रकरणात मुख्य भूमिका बजावली असल्याचे बुलले जाते. मात्र काही कर्मचारी सध्या कलेक्टरची भूमिका बजावत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कोतवालीतले नेते पाकीट घेते.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंद्यांचे साम्राज्य पसरले आहे. नेत्यांच्या आशीर्वादाने कोतवालीच्या हद्दीत तानाशाही जोरदार हुकुमत करत आहे. कलेक्टर नेते कोतवालीची अब्रू बंद पाकिटात निलाम करत आहेत. अवैध धंद्यांच्या तानाशाहिला नेत्यांचा आशीर्वाद वाढत चालला आहे. नेत्यांच्या आशीर्वादाने कोतवाली हद्दीत अनेक नवीन अवैध सुरु आहे. किरकोळ कारवाई करून आपण अत्यंत जबाबदार असल्याचे नेते भासवून देत असतात.
स्त्रोत.सोशल मिडिया.
नेते दोषी,नेत्यांवर चौकशी सुरु, तरीही नेते आज कलेक्टर ?
कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नेते आज कलेक्टर झाले आहेत. या नेत्यांच्या तानाशाहिला जनता वैतागली आहे. हेच नेते काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात दोषी आढळले होते. पोलिसांची बदनामी होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेत्यांना गुन्ह्यातून वगळून तानाशाहि नेत्यांवर वार्षिक वेतनवाढ दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्थगित केले होते. मात्र प्रशासनाने एवढी मोठी कारवाई करून देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने कानडोळा करून नेत्यांना पुन्हा कलेक्टर म्हणून पसंती दिली आहे.
भाग – ६
आरतीत कोणाची आरती, यांचे चाळे अधीक्षकांच्या वरती …..