विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, अजित पवार गटाकडून संग्राम जगताप यांना….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | MLA SANGRAM JAGTAP | EXPANSION OF THE CABINET BEFORE THE ASSEMBLY SESSION SANGRAM JAGTAP MAY GET MINISTER POST FROM AJIT PAWAR GROUP | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. याबाबत तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बऱ्याच काळापासून आमदार मंत्रीपद मिळण्याची वाट पाहत आहेत. मात्र अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे काही आमदार नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय महायुतीतील प्रमुख नेते घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
आमदार संग्राम जगताप यांची वर्णी….
या विषयावर बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की विधानसभा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. अनेक दिवसांपासून हा विस्तार रखडलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिदे गटातून आशिष जैस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. याशिवाय लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिणमधून पराभूत झालेल्या यामिनी जाधव आणि लता सोनावणे यांनाही मंत्रिपद मिळू शकते. अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भाजपकडून आमदार नितेश राणे, माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी, संजय कुटे, राणाजगजित सिंह पाटील आणि देवयानी फरांदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.