TIMES OF AHMEDNAGAR
आगामी काळात इंदापूर तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्याचे संकेत मिळत असून खासदार सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला उपस्थित होते. त्यानंतर शरद पवारांची सावली म्हणून ओळख असणारे सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांच्या घरी फडणवीस यांनी भेट दिली. यामुळे इंदापूर तालुक्यात उलट सुलट राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
याबाबत सोनई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने दैनिक सकाळ प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, सदर भेट ही कौटुंबिक भेट होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे जुने संबंध आहेत त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन चहा पान व अल्पोपहार घेतला यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तर प्रवीण माने म्हणाले, आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून रविवार ७ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
फडणवीसांनी फोडले पवारांचे विश्वासू ?
शुक्रवार ५ एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आले होते. यावेळी हेलिपॅड वर फडणवीस यांच्या स्वागताला पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती व खासदार सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रवीण माने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले तसेच त्यानंतर स्वतः फडणवीस हे सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांच्या घरी भेट दिली यावेळी कोणती राजकीय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र दशरथ माने प्रवीण माने यांची शरद पवारांच्या सभेला अनुपस्थिती आणि आज फडणवीसांची सोनाई परिवाराच्या घरी भेट यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान या भेटीवेळी आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक कुमार माने युवा उद्योजक अतुल माने यांच्यासह माने कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते.