अनैतिक संबंधातून अनेक गुन्हे घडतात. प्रियकराच्या मदतीने कट रचून पतीची हत्या केली जाते. पण पश्चिम बंगालमध्ये यापेक्षाही धक्कादायक प्रकार घडला असून, आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून पत्नीने आपल्या पतीला किडनी विकायला सांगितली. पण किडनी विकून आलेल्या पैशांतून तिने जे कृत्य केलय त्याची आता संपूर्ण राज्यभर चर्चा होत आहे. पश्चिम बंगालमधील हावडा येथील एका महिलेने आपल्या पतीला मुलीला चांगलं शिक्षण मिळावं याकरता किडनी विकण्यास प्रवृत्त केलं होतं. ती वर्षभरापासून तिच्या पतीवर किडनी विकण्याकरता दबाव आणत होती. पत्नीच्या दाबावाला बळी पडून पती त्याची किडनी विकण्यास तयार झाला. त्यानुसार, त्याने शस्त्रक्रिया करून किडनी काढून टाकली अन् त्याबदल्यात या जोडप्याला १० लाख रुपये मिळाले. पतीला लवकर रिकव्हर होण्याकरता पत्नीने आराम करण्याचा सल्ला दिला.
(संग्रहित दृश्य)
पत्नीने केली पतीची १० लाखाची फसवणूक
पण, काही वेळातच घरात ठेवलेली १० लाखांची रोखरक्कम घेऊन ती घरातून निघून गेली आणि पुन्हा परत आलीच नाही. घरातील तिजोरीत १० लाख रुपये नाही , असा आरोप तिच्या पतीने केला आहे. त्यामुळे त्याने तत्काळ यासंदर्भात पोलिसांना सांगितलं. पोलीस आणि मित्रांच्या मदतीने तिला कोलकाता येथून शोधून काढलं. एका वर्षभरापूर्वी ती फेसबूकवर एका व्यक्तीला भेटली होती. त्याच्याबरोबर तिची मैत्री होऊन नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ती १० लाख रुपये घेऊन त्याच्यासोबतच कर्नाटक येथे राहत होती. दरम्यान, पती, सासू आणि मुलगी महिलेच्या घरी गेले असता तिने त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. तिच्या कथित प्रियकराने त्यांना सांगितले की ती घटस्फोटासाठी ती अर्ज करणार आहे. तिच्या १६ वर्षांच्या वैवाहिक जीवनात सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाला असल्याचाही दावा केला आहे . व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.