अहमदनगर शहर हे अतिक्रमणांनी घेरले गेले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे अनेक अपघात घडतात.रस्त्यांवर अतिक्रमण करून काही लोकांनी उद्योगधंदे सुरु केले आहेत. अतिक्रमणांच्या अडचणींबाबत वारंवार अहमदनगर महानगर पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात येते मात्र महानगर पालिका प्रशासन कारवाई करण्यास असक्षम असल्याचे चित्र दिसून येते.
महानगर पालिकेच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण.
अहमदनगर महानगर पालिकेच्या हद्दीत अत्यंत महत्वाचे कार्यालये आहेत. त्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय,अहमदनगर महानगर पालिका अहमदनगर,सैन्य दलाचे बी.टी.आर. अहमदनगर,जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर हे महत्वाचे कार्यालय नगर,औरंगाबाद रोड वर आहेत. याच रस्त्यालगत फकीरवाडा दर्गाची जागा आहे. त्या दर्ग्याच्या जागेवर बेकायदेशीर पद्धतीने कोणत्याही कायदेशीर परवानगी न घेता हारून सत्तर सय्यद या व्यक्तीने बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम केले आहे. बांधकाम बेकायदेशीर असल्याचे मी लिखित स्वरुपात अहमदनगर महानगर पालिका,अहमदनगर यांना वारंवार कळवले होते. परंतु महानगर पालिकेने अद्यापही त्या अनधिकृत इमारतीवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही असे उपोषणकर्ते मोहसीन शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.
तारिक पे तारिक देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाची मागणी.
वारंवार या प्रकरणाला तारिक पे तारिक देण्याचे काम महानगर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. हारून सत्त्तार सय्यद हा व्यक्ती सुनावणीच्या सुरवातीला गैरहजर राहून पालिका प्रशासनाला खोटी कारणे देऊन फसवत होता. त्यावेळी महानगर पालिका प्रशासनाला मी त्याची कल्पना देखील दिली होती. मात्र महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक माझ्या तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही.
पुन्हा तौसीफ शेखची पुनावृत्ती ?
प्रशासनाला वारंवार न्यायाची मागणी करून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा न्याय न मिळाल्याने, न्यायाच्या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी तौसीफ शेख या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केले होते.प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे तौसीफ शेखचा होरपळून मृत्यू झाला होता.त्यावेळी तौसीफ शेखच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचे मंत्री.धनंजय मुंडे यांनी बोलले होते.
प्रशासन मोहसीन शेख यांच्याबद्दल खबरदारी बाळगेल का ?
महानगर पालिकेच्या नाकावर टिच्चून अनाधीकुतपणे इमारत उभी करून हारून सत्तार सय्यद यांनी महानगर पालिका प्रशासनाला थेट चालेंज केले आहे. तरी देखील मागील दोन वर्षांपासून महानगर पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे नाइलाजास्तव मला अहमदनगर महानगर पालिका येथे उपषणाला बसावे लागणार आहे. तरी मला पालिकेच्या वतीने न्याय मिळाला नाही या कारणास्तव मी महानगर पालिका येथे सोमवार दिनांक. १५ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहे. उपोषनाला बसून देखील न्याय न मिळाल्यास मी दिनांक. १६ जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहे. तरी या प्रक्रियेत मला कोणत्याही प्रकारे इजा झाल्यास त्याला मा. प्रशासन जबादार राहील याची आपण नोंद घ्यावी असे मोहसीन शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.