नाशिकमधील मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञातांचा अंदाधुंद गोळीबार…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | NASHIK | MIM | FORMER MAYOR AND METROPOLITAN PRESIDENT OF MIM ABDUL MALIK YUNUS ISA | MIM MLA MAULANA MUFTI ISMAIL | MALIK FIRED INDISCRIMINATELY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहेत. हाताला, पायाला तसेच बरगडीत गोळी लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
अंदाधुंद गोळीबार….
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अब्दुल मलिक हे मुंबई – आग्रा राष्ट्री महामार्गावरील एका हॉटेलवर चहापिण्यासाठी बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी मलिक यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला या गोळीबारात मलिक यांच्या हाताला, पायाला तसेच बरगडीत गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. या घटनेनंतर एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी रुग्णालयात जाऊन मलिक यांची भेट घेतली आहे. मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप आमदार मुफ्ती यांनी केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.