TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर – अवैध धंद्यांच्या विक्रीने हाहाकार माजवला आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याचे मोठे साम्राज्य आहे हे नव्याने सांगणे गरजेचे नाही. पोलिसांना वारंवार तक्रारी प्राप्त होऊन देखील तालुका पोलीसांनी कोणत्याही अवैध धंद्यावर कारवाईची हिम्मत केली नाही. तालुका हद्दीत असलेल्या एका हॉटेलवर अनेक दिवसांपासून परप्रांतीय महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली हि बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून तालुका पोलीसांना याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे कारवाई शून्य प्रक्रियेतून स्पष्ट होते.

गीतेंची भूमिका शांत आता नाही होऊ शकत संभ्याचा अंत !
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार , वेश्याव्यवसाय , गुटखा विक्री सारखे अनेक अवैध धंदे जोरात सुरु आहे. मोठ्या प्रमाणात चोऱ्या दरोडे पडणे हे तालुका हद्दीला नवीन नाही. मात्र तालुका पोलीस ठाण्याला निरीक्षक नवीन लाभले आहेत. काही दिवसांपासून प्रल्हाद गीतेंनी कारभार स्विकारला आहे. गीतेंच आगमन होताच अवैध कारभार बंद होण्याचे वातावरण पसरले होते. काही अवैध धंदे चालकांनी आपला कारभार बंद करण्याचे देखील ठरवले होते. मात्र काही दिवसांतच असा प्रकार घडला कि अवैध धंदे बंद न होता अजून मोठ्या प्रमाणात धंदे वाढले आहेत. गीतेंकडून असलेल्या नागरिकांच्या वैध अपेक्षा या आता अवैध ठरत असल्याची चिंता स्थानिक नागरिक खासगीत व्यक्त करत आहेत.मात्र गीते या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसून गीतेंचा या विषयात काही लोभ आहे का ? हि बाब शंका निर्माण करत आहे. गीते जर कारवाई करत नसतील तर अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे गीतेंची उचलबांगडी करण्याची हिम्मत दाखवतील का असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.


