TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर : जिल्हा परिषद हे काही ना काही कारणाने सतत चर्चेत असणार कार्यालय आहे. काही महिन्यांपूर्वी शिक्षकांच्या खोट्या घाटस्पोटाचे कागदपत्रे जमा करून मनमानीचा कारभार जिल्हा परिषदेत घडला आणि महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. तर काही दिवसांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा परिषद कार्यालयाची तोडफोड केली होती. जिल्हा परिषदेचे अधिकारी समस्या सोडवत नाही आणि मदतीसाठी फोन केल्यास फोन ला उत्तर देत नाहीत या कारणामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालायची तोडफोड केल्याचे समजते.
शासकीय अधिकारी हे सर्वसामान्य जनतेला सतत कायद्याच्या चौकटीत राहण्याच्या सूचना करत असतात. एखाद्या शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी यांना सर्वसामान्य व्यक्तीने मदत मागितल्यास कामांना टाळाटाळ करत हे अधिकारी कायद्याच्या चौकाटीचे कारण देऊन पळ काढतात. आपण कायद्याचा अत्यंत आदर करत असल्याचे ते फक्त नाटक करत असल्याचे अकोला प्रकरणातून स्पष्ट होते.
गटशिक्षणाधिकारी यांचा मनमानी कारभार.
अकोला पंचायत समितीतील प्रभारी गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांनी अधिकार कक्षेत नसतांना आठ शिक्षकांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने तर सत्तावीस शिक्षकांच्या तोंडी आदेशाने अशा एकूण पस्तीस शिक्षकांच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत परस्पर बदल्या केल्या आहेत. खताळ यांच्या कार्यपद्धतीबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या कालावधीत त्यांनी पदाचा दुरुपयोग करत संबंधित शिक्षकांच्या बदल्या केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. शिक्षकांच्या परस्पर बदल्या केल्याचा ठपका ठेवत अकोले पंचायत समितीतील प्रभारी गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांना निलंबित करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई केली. खताळ यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.