TIMES OF AHMEDNAGAR
भाग : १
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गुंडाराज सुरु आहे. या गुंडाराज्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना दिली म्हणून वकिलावर जीवघेणा हल्ला होता,तर खंडणीसाठी वकिलाचा जीवच घेतला जातो.यापूर्वी अहमदनगर शहरात व जिल्ह्यात अशी परिस्थिती कधी पाहायला मिळाली नाही. वर्तमानकाळात गुंडांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. कारण प्रमुख हे नावालाच आहे त्यांचा कारभार हा एक कर्मचारी पाहत असल्याचे समजते.
अवैध धंद्यांना ताकीद चालू ठेवा पाकीट ?
)
प्रमुखांचा कारभारी राज सांभाळतो “रविराज” ?
अहमदनगर जिल्ह्यातील गुंडांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मागील अनेक महिन्यांपासून अपयश आल्याचे चित्र आहे. खरतर अवैध धंद्यांमुळे हि गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांना प्रत्येक अवैध धंद्यांचे ठिकाण माहित असते. शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची पूर्व कल्पना खबरींच्या माध्यमातून पोलिसांना प्राप्त होते. मात्र काही घटनांना लक्ष्मी दर्शनाने काही पोलीस कानडोळा करत असल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्या वकिलाचे नावच एका पोलीस कर्मचाऱ्याने हल्लेखोरांना सांगितल्याचे जखमी वकिलाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना सांगितले होते.

हा करतो कलेक्शन गोळा,अन भरतो प्रमुखांचा झोला.?
खात्याला प्रमुख जरी असले तरी प्रमुखांना खुर्चीवर बसवण्याची अत्यंत मोठी भूमिका “रवी राज्यात” आहे. देशभरात सध्या रामराज्य आहे.२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे.रामाच्या या राज्याला गालबोट लावणारा हा “रवी राज” आहे. जिल्हाभर “रवी राज्य” असल्याने गुन्हागारांना कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही.लक्ष्मी दर्शन घेऊन या रवी राज्याला आपल्या ताब्यात घेतले जाऊ शकते असा पक्का विश्वास या गुंडांच्या टोळ्यांना आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आशीर्वाद आहेरी तो परत माहेरी.?
पोलीस खात्यांमध्ये अनेक प्रामाणिक कर्मचारी आहेत.परंतु काही लालच बहाद्दूर खात्याचे नाव बदनाम करत असतात. अनेकवेळा लालच बहाद्दुरांना लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना निलंबित देखील केले गेले आहे. निलंबित झाल्याने उध्वस्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून पोलीस मुख्यालयात नेमण्यात येते. मात्र “रविराज्यात” नियम बदलले असल्याचे चित्र आहे. खात्यातील एक कर्मचारी लाच स्विकारतांना रंगेहाथ अडकला होता. त्याची चर्चा भारतभर झाली मात्र त्या कर्मचाऱ्याला पुन्हा त्याच खात्यात रुजू करू घेण्यात आले. हे नवल नसून खात्यात देखील प्रमुखांची दहशत असल्याचे पोलिसांच्या खासगी चर्चांमधून स्पष्ट होते. ज्या खात्यात लाच स्विकारतांना रंगेहाथ तो पकडला गेला त्याच खात्यामध्ये पदमुक्त अधिकारी असल्याचे समजते. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यावर आहेरी आशीर्वाद असून त्याला परत माहेरी आणण्यास एवढे पुरेसे असल्याचे विरोधकांनी सांगितले.
उद्याच्या अंकात : फुटणार चिंगम गुंतणार सिंघम.

