हरियाणामधील बहुचर्चित रणजीत सिंह हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमसह अजून चौघांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे बाबा गुरमीत राम रहीमला दिलासा मिळाला आहे. या हत्या प्रकरणाचा निकाल तब्बल १९ वर्षांनी लागला आहे. १० जुलै २००२ रोजी रणजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. सीबीआय न्यायालयाने राम रहीमसह अजून चौघांना दोषी ठरवलं होतं. तसंच या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सीबीआय न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरु होती. यावर अखेर मंगळवारी उच्च न्यायालयाने निर्णय देत सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला. तसेच राम रहीमसह इतर चौघांची निर्दोष मुक्तता केली.

राम रहिमसह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता…..

डेरा व्यवस्थापनचे सदस्य असलेल्या रणजीत सिंह यांची १० जुलै २००२ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये रणजीत सिंह यांनी साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात निनावी पत्र लिहिल्याचा संशय होता. मात्र, या हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीसंदर्भात संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे करण्यात यावा, अशी मागणी रणजीत सिंह यांच्या मुलाने केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर २००७ मध्ये या हत्या प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीमवर आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र, आधी राम रहीमचं नाव या प्रकरणातील आरोपीमध्ये नव्हतं. पण सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास आल्यानंतर राम रहिमचा ड्रायव्हरच्या जबाबावरून राम रहिमचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने तपास पूर्ण केल्यानंतर या हत्या प्रकरणाचा २०२१ मध्ये निकाल लागला. यामध्ये गुरमीत राम रहीमसह इतर चार जण दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. यानंतर राम रहीमने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर आता उच्च न्यायालयाने राम रहिमसह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

Coronavirus in Maharashtra : कारागृहात कोरोनाचा भडका! तुरुंग रक्षकासह आठ कैदी कोरोनाग्रस्त - Marathi News | Coronavirus in Maharashtra : Corona erupts in prison! Eight prisoners, including a prison ...(संग्रहित दुष्य.स्त्रोत.सोशल मिडिया)

२० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा……

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरूमीत राम रहीमला २८ ऑगस्ट २०१७ ला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा झालेली असून रोहतक येथील तुरुंगात तो २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.