Reading:सावेडीच्या त्या दोन भावांचा त्याला राग आला, तो यंत्रणा घेऊन आला अन एका भावाच्या डोक्यात रॉड घातला. ३०७, ३२३, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल.
सावेडीच्या त्या दोन भावांचा त्याला राग आला, तो यंत्रणा घेऊन आला अन एका भावाच्या डोक्यात रॉड घातला. ३०७, ३२३, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | TOFKHANA POLICE STATION | INSPECTOR OF POLICE | CRIMINAL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – रस्त्यात उभा राहिल्याच्या करणातून दोन गटात मारहाण झाल्याची घटना सावेडी परिसरात घडली आहे. घडलेल्या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
त्याला राग आला आणि त्याने खुनाचा प्रयत्न केला. ?
रस्त्यात उभा राहिल्याच्या वादातून ५ जणांनी दोघा भावांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर एकाच्या डोक्यात कुर्हाडीने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना साई नगर भिस्तबाग चौक, सावेडी येथे बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत दत्तात्रय शिवाजी रोकडे हा जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जखमी दत्तात्रय याचा भाऊ वैष्णव शिवाजी रोकडे (रा. गौरी शंकर हौसिंग सोसायटी, साई नगर, भिस्तबाग चौक, सावेडी) याने तोफखाना पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वैष्णव व त्याचा भाऊ दत्तात्रय हे दोघे बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास साई नगर परिसरात रस्त्यावर बोलत उभे असताना तेथे त्यांच्या घरामागे राहणारा सोनू जोशी आला. व त्यांना रस्त्यात का थांबले अशी विचारणा केली. त्यावेळी या भावांनी तुला जायला रस्ता आहे ना, तु जा असे म्हणाले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
विनयभंग आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल.
साई नगर परिसरात रस्त्यावर बोलत उभे असताना तेथे त्यांच्या घरामागे राहणारा सोनू जोशी आला. व त्यांना रस्त्यात का थांबले अशी विचारणा केली. त्यावेळी या भावांनी तुला जायला रस्ता आहे ना, तु जा असे म्हणाले. त्याचा राग येवून तो रागात तेथून गेला व थोड्या वेळात तो त्याचा भाऊ मोनू जोशी, अभी कर्डिले, सागर गाणार, अजय बाबर असे ५ जण तेथे आले व त्यांनी दोघा भावांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील सोनू जोशी याने दत्तात्रय रोकडे याच्या डोयात कुर्हाडीने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ३०७, ३२३, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दत्तात्रय व वैष्णव रोकडे या दोघा भावांना रस्त्यातून बाजूला व्हा असे म्हटल्याचा राग येवून त्यांनी सोनू जोशी व त्यांच्या घरातील एका महिलेला मारहाण करत विनयभंग केला असल्याची फिर्याद एका महिलेने दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा भावांवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल केला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.