अहमदनगर महानगर पालिकेच्या हद्दीत फकीरवाडा दर्ग्याच्या जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम करून दहशत माजवणाऱ्या हरून सत्तार यांच्या अनाधिकृत इमारतीच्या बाबतीत वारंवार तक्रार करून देखील महानगर पालिकेने कोणतीही कारवाई न करता वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख यांनी आज सोमवार (दी.१५) महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर उपोष केले होते.
फकीरवाडा दर्गाच्या जागेवर अनाधिकृत इमारत बांधून दहशत करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख उपोषणाला बसले होते. प्रशासनाला पत्रव्यवहार करून आदी सूचना शेख यांनी दिली होती. अनाधिकृत इमारत पाडण्यासाठी शेख यांचे उपोषण सोमवार (दी.१५) सकाळी सुरु झाले. मात्र सकाळपासून उपोषणाला बसलेले शेख यांच्या उपोषणाला कोणत्याही अधिकाऱ्याने गांभीर्याने घेतले नाही. शेख यांच्या उपोषणाला पाठ फिरवणे अधिकाऱ्यांना महागात पडेल असे सध्या चित्र आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. कारण शेख यांना उपोषणावेळी अचानक भोवळ (चक्कर) आली. तातडीने शेख यांना जिल्हा रुग्णालय येथे अधिकच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांचा आर्थिक संबंध ?
अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या मागणीसाठी मागील दोन वर्षांपासून शेख यांचे प्रशासनाला पत्रव्यवहार सुरु आहेत. आपल्या पत्राला प्रशासन केराची दाखवल्याचे सांगत शेख यांनी महानगर पालिकेच्या समोर उपोषण केले. मात्र या उपोषकर्त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही.प्रशासन येईल आणि आपली चौकशी करून मार्ग कडेल या आशेवर शेख सकाळपासून बसले होते.काही तासांनंतर शेख यांना अचानक डोके धुखायला लागले आणि शेख यांचे हात-पाय फिरले घटना पाहताच शेख यांच्या घटनास्थळी उपस्थित मित्र परिवाराने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले.मात्र अधिकारी आले नाही त्याचे गैरार्जदार याच्यासोबत आर्थिक संबंध असल्याचे चर्चा सध्या सुरु आहेत.