मी ‘आयटीआय’चा फिटर आहे. कोणता पान्हा कसा लावायचा याचा खटका मला चांगलाच माहीत आहे,अशा विविध प्रकारचे निलेश लंके यांचे वक्तव्य.
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | SHEVGAON | AHMEDNAGAR LOK SABHA ELECTION | MP SUJAY VIKHE | FORMER MLA NILESH LANKA | NILESH LANKA'S SPEECH IN THE MEETING HELD IN SHEVGAON | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर जिल्ह्याची लोकसभा निवडणूक निलेश लंके व खासदर सुजय विखे अशी झाल्याने प्रचंड गाजली आहे. दोघांनीही एकमेकांस तोडीसतोड टक्कर दिली असल्याचे बोलले जात आहे. आता येत्या चार तारखेला या सामन्याचा रिझल्ट येईल. दरम्यान त्याआधीच माजी आमदार निलेश लंके यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
गरिबाला छळणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो.
शेवगावमध्ये एका कार्यक्रमात बोलता ते म्हणाले, ‘मी कमी शिकलो आहे, मला इंग्रजी येत नाही, असा आरोप झाला; पण मी ‘आयटीआय’चा फिटर आहे. कोणता पान्हा कसा लावायचा याचा खटका मला चांगलाच माहीत आहे. तो जुळवला असून, याची अनुभूती लवकरच येईल. असंख्य अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली आहे. कोणी कोणी मदत केली आज जाहीर करणार नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे आता या अदृश्य शक्ती कोण याची चर्चा सध्या सुरु आहे. कोनोशी (ता. शेवगाव) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अॅड. प्रताप ढाकणे, शिवशंकर राजळे, दिनकर पालवे, रामदास गोल्हार, वंचितचे उमेदवार दिलीप खेडकर आदी उपस्थित होते.
स्त्रोत सोशल मिडिया
सभेत नेमक काय म्हणाले निलेश लंके ?
लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांची मदत मिळाली. सर्वपक्षीय कार्यकर्ता सोबत असून, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. त्यांनी ते करू नये अन्यथा ४ जूननंतर सर्व हिशेब चुकता केला जाणार आहे. आमच्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जातो पण आम्ही गुंड नसून गरिबाला छळणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो. पैसे कमविण्यापेक्षा जिवाभावाची माणसे सोबत असली, तर जीवनात काही कमी पडत नाही. माझी प्रस्थापितांच्या विरोधात लढाई आहे. लोकसभेत चार पिढ्या राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात लढणे हे सोपे काम नव्हते पण असंख्य अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली. कोणी कोणी मदत केली आज जाहीर करणार नाही; पण निकालानंतर सर्व कळणार आहे असे माजी आमदार निलेश लंके म्हणाले आहेत.