भाजपच्या नेत्याने अत्यंत गलिच्छ पणे महिलांना धमकी दिली आहे. यासंदर्भात आम्ही केस करत आहोत. इलेक्शन कमिशनला पहिल्या टप्प्यात नोटीस पाठवली आहे. हा छत्रपतींचा, शाहुंचा, फुलेंचा महाराष्ट्र आहे. महिलांबाबत गलिच्छ बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भाजपची संस्कृती आहे. सातत्याने महिलांचा अपमान करतात, धमकी देत आहे. नगरमध्ये बाळासाहेबांच्या लेकीला गलिच्छ भाषा वापरली, धमकी दिली. आता पुन्हा महाडिक यांनी धमकी दिली आहे. हे स्वतः ला काय समजतात? अदृश्य शक्ती? अदृष्य शक्ती मागे आहे म्हणून काहीही करतील का? अशा गलिच्छ विधान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहू. महिला पाहिजेत तिथे जातील. लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करून दाखवावेत. गाठ या सुप्रिया सुळेंशी असेल. प्रत्येक महिलेच्या पुढे ढाल म्हणून राहील, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
(संग्रहित दृश्य.)
महाराष्ट्राला हक्काचं आणि स्वाभिमानी सरकार हवं.
महाडिक यांनी लाडक्या बहिणींना धमकी दिल्यानंतर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. यांचे तिन्ही पक्ष हे दिल्लीतून चालतात. महाराष्ट्राला हक्काचं आणि स्वाभिमानी सरकार हवं असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंना पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. पक्षाच्या नोटीसखाली पक्षाच्या अध्यक्षांचा उल्लेख आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. आम्हाला धमकी देण्यात आली. आमच्यावर क्रिमिनल केस करू, अशी धमकी देण्यात आली आहे. आमच्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात बोल्याच म्हटलं आहे. हे सर्व टिंगरे यांच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. ती नोटीस तुम्ही सर्वांनी पहावी. शरद पवार, उद्धव ठाकरे, खरगे यांना सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे. याच उत्तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी द्यावं. पोर्षे घटनेत दोघांची हत्या झाली, हे पाप असेल तर मी यावर बोलणार. हिंजवडी माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी डेटा बघावा फेक नेरेटिव्ह नाही. त्यांना वाटत असेल मी खोटं बोलत असेल तर फडणवीस यांना उत्तर द्याव लागेल. हिंजवडीतील रस्ते सुधारा, पाणी प्रश्न, गुन्हेगारी, ड्रग्स बाबत पाठपुरावा केलाय. यावर फडणवीस यांनी काय केलं ? हा फेक नेरेटिव्ह आहे का? देवेंद्र फडणवीस हे आम्हाला फेक नेरेटिव्हचे डायरेक्टर, क्रिएएटर म्हणतात. ७० हजार कोटींची आरोप फडणवीस यांनी केला. त्या फाईलवर फायनल सही देवेंद्र फडणवीस यांची होती. ज्यांनी या घोटाळ्याची चौकशी लावली त्याच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असलेल्या अजित पवारांना घरी बोलवून फाईल दाखवली. हे फेक नेरेटिव्ह नाही, वास्तव आहे. याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावं.