महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीदेखील पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
(संग्रहित दृश्य.)
लोकांना माहिती आहे की आरोपात काही तथ्य नाही.
संग्राम जगताप म्हणाले की तयारी आपल्याला निवडणुकीपूरती करून चालत नाही. आपण विजयी झालो की, पुढच्या निवडणुकीची तयारी करावी लागते. विकासकामे मोठ्या प्रमाणावर करावे लागतात. त्यामुळे आम्ही दोन्ही वेळेला निवडून आलो आणि लोकांनी आम्हाला दोन्ही वेळेस संधी दिली. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. निवडणूक लागली की आपल्यावर गुंडगिरीचा आरोप होतो. याबाबत विचारले असता संग्राम जगताप म्हणाले की उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मला उत्तर देण्याची आवश्यकता पडली असती तर लोकांनी मला संधी दिली नसती. त्यामुळे लोकांना माहिती आहे की, आरोपात काही तथ्य नाही. कारण जिथे लाखो लोकांचं बहुमत असतं त्याला लोकशाही म्हणतात. त्यामुळे या विषयावर फार महत्व देण्याची आवश्यकता नाही. आम्ही गुंडगिरी केली असती तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती, असं उत्तर त्यांनी दिले आहे.
(संग्रहित दृश्य.)
कुणीही उमेदवारी केली तरी फरक पडणार नाही.
नगरचे माजी महापौर आणि संग्राम जगताप यांचे नातेवाईक संदीप कोतकर हेच जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे त्याबाबत संग्राम जगताप यांना विचारले असता मला कुणाचेही आव्हान वाटतं नाही मी पाच वर्षे काम केले आहे. त्यामुळे समोरून कुणीही उमेदवारी केली तरी फरक पडणार नाही असं जगताप म्हणाले. तर अहिल्यानगर शहरातील भाजप नेत्यांनी अहिल्यानगरमध्ये मैत्री पूर्ण लढतीची मागणी केली होती. त्याबाबत बोलताना असं काही होणार नाही आणि माझाच विजय होईल असा विश्वास आ. जगताप यांनी व्यक्त केलाय.