अहमदनगरमधील एका बांधकाम व्यावसायिकाची खोटे व बनावट दस्त बनवून कोटींची जमीन हडप करून त्यांना….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | FRAUD OF EIGHT CRORE RUPEES IN THE LAND PURCHASE AND SALE TRANSACTION OF A BUILDER | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाची जमीन खरेदी विक्री व्यवहारात तब्बल आठ कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ही घटना घडली असून बुधवारी (दि. ३०) रात्री उशिरा या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बबनराव जाधव (वय ४१ रा. विजयनगर, बोल्हेगाव फाटा, नगर) असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
तब्बल ६ जणांविरोधात गुन्हा दाखल.
व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून साईराम अर्बन मल्टीस्टेट बीडचे शाहीनाथ विक्रमराव परभणे (रा. माळी वेस, बीड), संत भगवान बाबा मल्टीस्टेट मुख्य शाखा बालमटाकळी शेवगावचे चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य (रा. बालमटाकळी ता. शेवगाव), अरकान प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नाशिकच्या वैशाली योगेश गायकवाड (रा. प्रथमेश प्लाझा, ए/३०२ सोनी पैठणीजवळ, राका कॉलनी, नाशिक), सचिन शिवराम गरदास (रा. श्रमिक नगर, सावेडी), संत भगवान बाबा मल्टीस्टेटचे मॅनेजर नितीन सोपानराव तुपे (रा. आगरकर मळा, नगर), साईराम अर्बन मल्टीस्टेटचे मॅनेजर शरद सिताराम कुलकर्णी (रा. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
फिर्यादीला पाच कोटी ४६ लाख रूपयांचे खोटे चेक….
संशयित आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालय, नगर व संत भगवान बाबा मल्टीस्टेट सोसायटी, चाणक्य चौक येथे कट कारस्थान करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. फिर्यादीला पाच कोटी ४६ लाख रूपयांचे चेक दिले होते. मात्र, ते न वटता परत आले. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय येथे खोटे व बनावट दस्त करून फिर्यादीची जमीन हडप करून त्यांना पैसे न देता खोटा आर्थिक व्यवहार दाखवला आहे. फिर्यदीचे एकूण आठ कोटी पाच लाख रूपये फिर्यादीला न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत.