आयजीसाहेब आतिकच्या गुटखा विक्रीने अन् दीपकच्या अवैध कलेक्शनने नागरिकांना त्रास होतोय फार, याअवैध साम्राज्याला कधी करताय गार ?
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE, AHMEDNAGAR | ILLEGAL SALE OF GUTKHA | BHINGAR CAMP POLICE STATION, AHMEDNAGAR | A PERSON NAMED ATIQ IS SELLING ILLEGAL GUTKHA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहरात अवैध धंद्यांचे साम्राज्य वारंवार वाढतच चालले आहे. या अवैध साम्राज्याला उध्वस्त करण्याची हिम्मत प्रशासनामध्ये राहिलेली नसल्याचे बोलले जाते. सुगंधित तंबाखू,मावा , गुटखाचे सेवन केल्याने अनेक तरुणांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अनेक तरुणांना कॅन्सर सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. दुर्दैवी अनेक तरुणांना या आजारामुळे प्राण देखील गमवावे लागत आहे.
संग्रहित.दृश्य.
चहा पेक्षा केटली गरम.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध कारभाराला लगाम लावण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस अपयशी ठरले आहेत हे नव्याने सांगायची आवशकता नाही. प्रभारी राज असल्याने अधिकाऱ्यांची नस दीपक दादांच्या हातात असल्याचे दादा बाहेर बिनधास्त सांगत फिरतात. त्यामुळे चहा पेक्षा केटली गरम अशी म्हण वापरल्यास वावगे ठरणार नाही. भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु आहे. या धंदे चालकांकडून दीपक दादा लाखो रुपयांची काळी मलाई जमा करत असून हि मलाई अधिकाऱ्यांच्या घशात घालत असल्याची सध्या भिंगार शहरात जोरदार चर्चा सुरु असल्याचे समजते.
संग्रहित.दृश्य.
आतिकचं आणि दीपकचं आर्थिक लफडं ?
भिंगार शहरात गुटखा , हिरा , सुगंधित तंबाखू असे अवैध आमली पदार्थ विक्रीचा म्होरक्या आतिक हा दिवसेंदिवस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरात अवैध साम्राज्य वाढवत आहे. या आतिकला दीपक दादा सहकार्य करत असून हा दादा भिंगार शहरातील अवैध कारभार चालवणाऱ्या चालकांकडून महिन्याला लाखोंची वसुली करत आहे. हि वसूली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने सुरु असून या प्रकरणाची गंभीर दखल अद्यापही प्रशासनाने घेतलेली नाही. मात्र आतिक आणि दीपक यांच्या आर्थिक लफड्याने अनेक अधिकाऱ्यांची वेळप्रसंगी गोची होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.