TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | KARNATAKA | BANGALORE | KARNATAKA LOK SABHA CONSTITUENCY | NDA CANDIDATE PRAJWAL REVANNA | CONGRESS CANDIDATE SHREYASH PATEL | PRAJWAL REVANNA HAS BEEN DEFEATED IN THE LOK SABHA ELECTIONS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
कर्नाटकच्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या एनडीए आघाडीचे उमेदवार आणि अटकेत असेलला आरोपी प्रज्वल रेवण्णाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. जेडीएसमधून निलंबित करण्यात आलेला हसन लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला प्रज्वल रेवण्णा पराभूत झाल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात जर्मनीतून भारतात आल्यानंतर प्रज्वल यास कर्नाटक पोलिसांनी बंगळुरु विमानतळावरुन अटक केली आहे. दरम्यान, आज हाती आलेल्या निकालानुसार कर्नाटकच्या हसन लोकसभा मतदारसंघातून प्रज्ज्वल रेवण्णाचा पराभव झाल्याचे दिसून येत आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल आघाडीवर
यंदाच्या निवडणुकीत प्रज्वल रेवण्णाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजप नेत्यांनाही या मुद्द्यावरुन प्रचाराला सामोरे जाताना अडचण आल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकसह देशभरात प्रज्ज्वल रेवण्णाच्या मुद्द्यावरुन रणकंदन घडले होते. आता, निवडणूक निकालात जनतेने नाकारल्याचे दिसून येत आहे. दुपारी १२.४५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार प्रज्वल रेवण्णा यास ४ लाख ९१ हजार ०६७ मत मिळाली आहेत. तर, काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल यांना ५ लाख १४ हजार ४८५ मते मिळाली आहे. त्यामुळे, सध्या २३,४१८ मतांसह पटेल आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार प्रज्ज्वल रेवण्णाचा पराभव झाल्याची माहिती आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
सध्या प्रज्वल रेवण्णा बंगळुरु पोलिसांच्या कोठडीत….
दरम्यान,बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रज्वल रेवण्णा पोहोचताच त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला इंटरपोलने गुरुवारी प्रज्वल रेवण्णाच्या भारतात येण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेसाठी पूर्वतयारी करुन ठरली होती. बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीने प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच अटकेची कारवाई केली. सध्या प्रज्वल रेवण्णा बंगळुरु पोलिसांच्या कोठडीत आहे.