माझी उमेदवारी कोणाला त्रास देण्यासाठी नसून शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आहे. मी निष्ठावंत शिवसैनिक असल्याने भगवा वाचविण्यासाठी आहे. शेतकर्यांच्या समस्या माहित असल्याने त्या सोडविण्यासाठी मी उमेदवारी केली असल्याचे सांगत आपण लोकसभेला पारनेरकरांना साथ दिली आहे. आता पारनेरकरांनी आपली सावड फेडावी. नगर तालुक्यातील सर्वसामान्य आमदार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी व्यक्त केले आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्या प्रचाराला नगर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, देऊळगा सिद्धी, सारोळा कासार, घोसपुरीचा दौरा करण्यात आला होता. या दौर्यात गावागावातील युवक उर्त्स्फूतपणे सहभागी झाले होते.
(संग्रहित दृश्य.)
संदेश कार्ले यांनी आमच्या डोक्यावरील हंडा…
यावेळी संदेश कार्ले म्हणाले, राजकारणाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पारनेर-नगर तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, भगवा फडकविण्यासाठी, मी उमेदवारी केली आहे. आमदार झाल्यानंतर शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य राहिल. शेत मालाला भाव, पाणी, दिवसा वीज पुरवठा यावर भर देणार आहे. दिवसा वीज पुरवठ्याचे चिचोंडी पाटील मॉडेल बनवायचे आहे. शेतकर्यांच्या अडचणी माहित असल्यामुळे शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन कार्ले यांनी उपस्थितांना केले आहे. नगर तालुक्यातील सर्वसामान्य माणून आमदार करण्याची हीच वेळ असल्याचेही ते म्हणाले. नगर तालुक्याला पाण्याचा शाश्वत सोर्स नाही. बुर्हाणनगर व घोसपुरी पाणी योजनेवर नगर तालुकाकरांची तहान भागविली जाते. बंद अवस्थेत असलेली घोसपुरी पाणी योजना संदेश कार्ले यांनी सुरु करुन नफ्यात आणली. घोसपुरी पाणी योजनेच्या अंतर्गत येणार्या गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे काम केले. नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी, घोसपुरी, देवळगाव सिद्धी, खंडाळा, अरणगाव, सोराळा कासार गावात घेतलेल्या कॉर्नर सभांना महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संदेश कार्ले यांनी आमच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याने संदेशच आमचा लाडका भाऊ असल्याच्या भावना व्यक्त केले, यावेळी महिलांना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.