नौदलाच्या सैनिकाने केली देशाशी गद्दारी ?
तरुणाने भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली.
नौदलाच्या सैनिकानेचे केली भारत देशाशी गद्दारी ?
रशिया व युक्रेन नंतर फिलीस्तीन व इज्राइलचे युद्ध सुरु झाले,अशातच विश्वयुद्ध होण्याची शक्यता दर्शवण्यात येत होती. भारत देश हा ताकतवर देश म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांत भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे प्रकार वाढत असल्याची माहिती आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून काहींनी माहिती दिली, तर प्रेमाच्या जाळ्यात अडकून काहींनी भारत देशाची माहिती पाकिस्तानला दिली. सर्वसामान्यांच्या हातून असा प्रकार घडणे हा योगायोग जरी मानला तरी देशाच्या पुढील नुकसानाचे त्यांना माहित नसते.
किरकोळ रकमेसाठी भारतीय नौदलाच्या सैनिकाने पाकिस्तानला पुरवली भारताची माहिती :
देशाच्या सेवेत रुजू असलेल्या व्यक्तीनेच जर देशासोबत गद्दारी केली तर काय होईल याचे भान कदाचित त्यांना असावे, असाच एक दाक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय आहे.धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानला माहिती देणारा तरूण नौदलाचा सैनिक आहे.आणि त्याने पैशांच्या लोभापोटी पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचं बोललं जात आहे.
पैशांच्या मोबदल्यात देशालाच विकले. ?
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले कि पीआयओ या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेकडून गौरव पाटीलला माहितीच्या बदल्यात पैसे पाठविण्यात आले होते. हा सर्व प्रकार एप्रिल-मे आणि ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला. गौरव पाटील याच्यासह आणखी तीन लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या तिघांनीही या प्रोफाईलवरून चॅटिंग केली होती. गौरव पाटीलला अटक केल्यानंतर न्यायालयात सादर केले होते, न्यायालयाने त्याला एक आठवड्याची पोलिस कोठडी सुनावली.एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गौरव पाटीलला पाकिस्तानकडून खूप पैसे मिळालेले नाहीत. पण निश्चित रक्कम किती होती, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
नौदलाच्या सैनिकाने केली देशाशी गद्दारी ? तरुणाने भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली.
भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) एका २३ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. सदर तरुणाचे नाव गौरव पाटील असल्याचे एटीएसने सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने एक्स या सोशल मीडिया साईटवर ही बातमी दिली आहे. हा तरूण नेव्हल डॉक येथे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करत होता. अटक केलेला तरूण हा व्हॉट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया साईटद्वारे पाकिस्तानमधील गूप्तहेर संघटनेच्या (Pakistan-based Intelligence Operative – PIO) संपर्कात होता. एटीएसने एकूण चार लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतर तीन लोक गौरव पाटीलच्या संपर्कात होते, असेही दहशतवादी विरोधी पथकाने सांगितले आहे.एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक केलेला तरूण गौरव पाटील हा फेसबुकच्या माध्यमातून काही अज्ञात प्रोफाईलच्या संपर्कात होता. या प्रोफाईलला त्याने डोकयार्डवरील काही महत्त्वाचे व्हिडिओ आणि फोटो पाठविले होते. सदर तरूणाने काही गोपनीय माहिती पाकिस्ताच्या गुप्तहेर संघटनेला पुरविली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोरीचा नाद,हानी ट्रॅप.
दहशतवादी विरोधी पथकाने सदर तरुणाला नवी मुंबईतील त्याच्या घरातून अटक केली. चौकशी दरम्यान हा तरुण हनी ट्रॅपचा शिकार झाला असल्याचे समोर आले आहे. फेसबुकवरील मुक्ता माहतो, पायल एंजल आणि आरती शर्मा या फेसबुकवरील प्रोफाईलशी तो संपर्कात होता. हे तीनही प्रोफाईल पाकिस्तानमधून चालविले जात होते. या प्रोफाईलच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांनी गौरव पाटीलशी संपर्क साधला आणि त्यानंतर व्हॉट्सअपद्वारे त्यांचे चॅटिंग सुरू झाले. एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार भारतीय जहाजांसंबंधीची काही गोपनीय माहिती आणि प्रतिबंधित परिसराचे फोटो गौरव पाटीलने व्हॉट्सअपवर शेअर केले होते.