TIMES OF AHMEDNAGAR
नगर शहरातील सर्व चौकातील सिग्नल चालू करा न झाल्यास मनसे तर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे यांनी सांगितले आहे. नगर शहरातील मुख्य चौकामध्ये सिग्नल बंद झाले आहे. नगर मधील सर्वच महत्त्वाचे रस्ते हे कायमच गर्दीने गजबजलेले असतात तेथील सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी सिग्नल बंद आहेत त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसतात. सिग्नल बंद असल्यामुळे ट्राफिकचे नियोजन व्यवस्थित होत नाही अनेक अवजड वाहने मोठ्या वेगाने शहरात फिरत असतात. भविष्यात महत्त्वाच्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात त्यामुळे तेथील सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर चालू करावी यासाठी मनसे तर्फे आज आयुक्त श्रीकांत पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.


