खरा वाघ कधी सांगत नसतो, मी वाघ आहे. म्हणून नगरमधील जनतेने ठरवलं आहे कोण वाघ आहे. त्यामुळे मांजराने वाघाचा झुल पांघरलं म्हणजे तो वाघ होत नसतो ते जनतेने ठरवायचं असतं, अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
(संग्रहित दृश्य.)
बळीराजाचे म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येणार..
खासदार निलेश लंके आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी अंबाबाई मंदिरामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.लंके यांनी आगामी निवडणुकीच्या निवडणुकीवर भाष्य केलं. ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात बळीराजाचे म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्यांमध्ये बदल अटळ असल्याचा दावा सुद्धा निलेश लंके यांनी केला आहे. ते म्हणाले की बेरोजगारी शेतकरी तरुणांच्या मुद्द्यांवर विचार करणारे सरकार राज्यांमध्ये स्थापन होईल. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की शरद पवार साहेबांकडे गेलो की आपण निवडून येऊ शकतो असं वाटत असल्याने आमच्याकडे सर्वाधिक इनकमिंग होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांचा सर्वाधिक स्ट्राईक होता, असेही त्यांनी सांगितले.