माहेरी आलेल्या विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर दमदाटी करत ५ दिवस शारीरिक अत्त्याचार आणि तिच्या कुटुंबियांना….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | RAHURI | KIDNAPPED A WOMAN AND RAPED HER FOR 5 DAYS AND THREATENED HER FAMILY NOT TO TELL ANYONE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
एका विवाहितेस राहुरीतून अपहरण करून श्रीरामपुरात आणले होते. व तेथे तिच्यावर दमदाटी करत अत्याचाहर करण्यात आला आहे. या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जावयांना सांगून मुलींचा संसार मोडेल अशी धमकी दिली गेली. या विवाहितेवर पाच दिवस अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पिडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली आहे. त्यावरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक नानासाहेब सोनवणे (रा. वडाळा महादेव, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता पतीशी वाद झाल्याने ती माहेरी राहत होती.
स्त्रोत सोशल मिडिया
महिलेवर इच्छेविरुद्ध अत्त्याचार….
राहुरी तालुक्यातील ३४ वर्षीय महिला लग्नानंतर श्रीरामपुर तालुक्यात पतीसोबत राहत होती. दरम्यानच्या काळात पती-पत्नीत काही कारणांवरून भांडण झाली होती. त्यामुळे ती सासर सोडून माहेरी आली होती. दोन वर्षापासून ओळख असलेल्या कार्तिकसोबत सहा महिन्यापूर्वी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. ९ जून रोजी ही विवाहिता राहुरीत आली होती. कार्तिकही तेथे पोहचला होता. त्याने तिला बसस्थानक परिसरात बोलावून घेतले. येथे माहेरी काय करते माझ्यासोबत चल, मी तुझ्याशी लग्न करतो आणि तुला सुखात ठेवेल.असे गोड बोलून तिला चारचाकी वाहनातून श्रीरामपुरात आणले होते. गोंधवणी येथे दमबाजी करत सलग ५ दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आला. इच्छेविरुध्द झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा बोभाटा केला तर तुझ्या जावयांना सांगून मुलींचा संसार मोडेल अशी आरोपी कार्तिकने पिडीतेच्या कुटुंबियांना धमकी दिली होती.
स्त्रोत सोशल मिडिया
राहुरी पोलिसात पिडीत महिला गायब असल्याची तक्रार….
राहुरी पोलिसांत विवाहिता गायब असल्याची तक्रार दाखल झाली होती. राहुरी पोलिसांनी शोध घेवून पिडितेचा छडा लावला आहे. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडितेच्या तक्रारीवरून राहुरी पोलिसात कार्तिक सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.