बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे हात धुवून लागला आहे. बिश्नोई टोळीकडून सलमानला वारंवार धमक्या मिळत आहे . राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर आता देशभरात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई आता राजकारणात एन्ट्री करतो की काय ? अशी चर्चा सुरू झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई याला आता थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मधून आमदार झिशान सिद्दीकी विरोधात लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला ऑफर आली आहे.
(संग्रहित दृश्य.)
लॉरेन्स बिश्नोई याची गँग आता महाराष्ट्रात सक्रिय.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या काही शूटरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची अनेक वेळा धमकी लॉरेन्स बिश्नोईकडून देण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांनी अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील एका प्रकल्पातील जवळपास ६२३ गरीब लोकांना बेघर केलं. आसा आरोप पंडित सुनील शुक्ला यांनी केला आहे. या संदर्भात कोर्टात री पिटीशन देखील दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. बाबा सिद्दीकी देशभक्त नाही, लॉरेन्स बिश्नोई देशभक्त आहे. तर लॉरेन्स बिश्नोई हा उत्तर भारतीय समाजाचा आहे. बिश्नोईमध्ये आम्हाला शहीद भगत सिंग दिसतो. त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात विचार करावा, अशी विनंती केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेकडून गुजरात येथील साबरमती जेल प्रशासनाला निवेदन लिहून मागणी करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला पूर्ण पाठिंबा आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईला ऑफर देण्यात आली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची गँग आता महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे. त्याच्या गँगने सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी हत्या घडवून आणली. सलमान खानचे जवळचे संबंध असणाऱ्या माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारीही बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरामधील साबरमती कारागृहात आहेत. लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती कारागृहातील सर्वात सुरक्षीत अंडा सेलमध्ये कैद आहे.