By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: हवेत गोळीबार करून दहशत करणाऱ्यांना एलसीबीचा दे दणका ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > हवेत गोळीबार करून दहशत करणाऱ्यांना एलसीबीचा दे दणका ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त.
अहमदनगर

हवेत गोळीबार करून दहशत करणाऱ्यांना एलसीबीचा दे दणका ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त.

Last updated: 2025/02/10 at 12:09 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

शिर्डी येथे गावठी कट्टयातुन हवेत फायर करून दहशत निर्माण करणारे ३ आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून ३ गावठी कट्टयासह दोन लाख सत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हेशाखेने आपली मोहीम अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांकडे वळवली.

गोळीबार | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.(संग्रहित दृश्य.)

जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती शनिवार (दि. ८) रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गणेश आप्पासाहेब शेजवळ, रा.भिमनगर, शिर्डी, ता.राहाता याचेकडे अग्नीशस्त्र असून त्याने दहशत निर्माण करण्याकरीता फायर केले असून, फायर केल्याचा व्हिडीओ त्याचे मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाली. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तुषार धाकराव, व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब नागरगोजे, रोहित येमुल, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सारीका दरेकर व अरूण मोरे यांचे पथक तयार करून संशयीताची माहिती घेवुन पडताळणी करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. तपास पथकाने शनिवार (दि. ८) रोजी संशयितांचा शोध घेत असता आरोपी आरबीएल चौकाजवळ, शिर्डी ता.राहाता याठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव  गणेश आप्पासाहेब शेजवळ, वय ३४, रा.भिमनगर, शिर्डी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. त्याला विश्वासात घेऊन अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने मोबाईलमध्ये अग्निशस्त्रचा व्हिडीओ दाखवला. व सदरचे अग्नीशस्त्र हे त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ याचेकडे ठेवले असल्याची माहिती दिली. पथकाने पंचासमक्ष अजय रत्नाकर शेजवळ, रा.भिमनगर, शिर्डी, ता.राहाता याचे घरातुन एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा त्यात ३ गावठी पिस्टल, ३  जिवंत काडतुसे व ३ रिकाम्या काडतुसाच्या पुंगळया जप्त केल्या आहेत. ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ व अजय रत्नाकर शेजवळ यांचे कब्जातुन एक लाख वीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत.

Desi katta pistol sixer(संग्रहित दृश्य.)

ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ याचेकडे मिळून आलेल्या गावठी पिस्टल व काडतुसाबाबत विचारपूस केली असता त्याने भाऊसाहेब साहेबराव जगताप रा.शिर्डी, ता.राहाता, राकेश पगारे पुर्ण नांव पत्ता माहित नाही, रोशन सोमनाथ कोते रा.शिर्डी, ता.राहाता यांचेकडून प्रत्येकी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे खरेदी करून, त्यापैकी ३ काडतुसे हवेत फायर केले असल्याचे सांगीतले. पिस्टल विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता त्यातील रोशन सोमनाथ कोते, वय २४ , रा.शिर्डी, ता.राहाता हा मिळून आलेला असून उर्वरीत फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे. आरोपीविरूध्द शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. ११६/२०२४  आर्म ऍ़क्ट कायदा कलम ३/२५, ७, २७  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article प्रसिद्ध उद्योगपतीची हत्या ; मालमत्तेच्या वादातून नातवाने आजोबांना ७३ वेळा चाकूने भोसकले !
Next Article भाई सथ्था नाईट हायस्कूलचे स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले ; मोबाईलचे धोके दर्शविणाऱ्या मुक नाटीकेने वेधले लक्ष.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?