महाराष्ट्राला आता महिला मुख्यमंत्री ; शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा शरद पवार होणार प्रथम महिला मुख्यमंत्री. ? अजित पवारांचा देखील उल्लेख …….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICAL NEWS VIDYA GADEKAR NEWS | SHARAD PAWAR | MAKE PRATIBHA SHARAD PAWAR CHIEF MINISTER NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
सध्या महाराष्ट्रात विधानसभेच वार आहे.महाराष्ट्रावर कोण राज्य करणार ? कोणाच सरकार येणार ? या चर्चांना उधान आले आहे. तर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी माजी.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडे केली होती. मात्र ठाकरेंच्या या मागणीला शरद पवारांनी उत्तर देत महाराष्ट्रात ज्या पक्षाच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असे उधान करत ठाकरेंच्या मागणीला पूर्ण विराम दिला होता. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आता शरद पवारांच्या पत्नीलाच मुख्यमंत्री करा असे फलक शेवगाव-पाथर्डी मतदार संघात झळकावल्याने आता शरद पवारांच्या नवीन डावाकडे सध्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
(संग्रहित दृश्य.)
अजित पावरांसारखा एक सक्षम उपमुख्यमंत्री देणाऱ्या महिलेलाच मुख्यमंत्री करा.
महाराष्ट्रात महिलांवर होणारे बलात्कार व अत्याचार थांबावंण्यासाठी महाराष्ट्राला एका सक्षम महिला मुख्यमंत्र्याची गरज आहे.म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक बाप,व सक्षम महिला संसदपटू खासदार व अजित पावरांसारखा एक सक्षम उपमुख्यमंत्री देणाऱ्या महिलेलाच मुख्यमंत्री करा अशा आशयचे फलक शेवगाव-पाथर्डी मतदार संघात झळकत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) प्रदेश सचिव विद्या गाडेकर यांनी हे फलक लाऊन एका नवीन राजकीय घडामोडीला वळण दिल्याने सध्या पवारांचे पुढचे राजकारण काय ? यावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
(प्रतिभा पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचे फलक झळकत आहे.)
प्रतिभा शरद पवार महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री ?
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव (संघटक) विद्या गाडेकर यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास प्रथम महिला मुख्यमंत्री पदाचा मान शरद पवार यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पवार यांना देण्याचा त्यांनी आग्रह धरला आहे. तर या मागणीचे थेट फलक शेवगाव-पाथर्डी मतदार संघात लावण्यात आले आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी विद्या गाडेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधले होते. महिलांच्या संरक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी एका महिला मुख्यमंत्रीची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. प्रतिभा पवार यांना महिला मुख्यमंत्री करण्याची नव्याने मागणी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या मागणीने देखील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे जाणकारांनी व्यक्त केली आहे.
(स्त्रोत.प्रतिभा शरद पवार. सोशल मिडिया.)
प्रतिभा पावरांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आल्यास कोणीही विरोध करणार नाही.?
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु आहे.माजी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असा आग्रह धरला असतांना ज्या पक्षाच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल अशा एका शब्दात शरद पावरांनी या आग्रहाला ब्रेक लावला होता. मात्र आता महाराष्ट्राचे राजकारण बदलतांना दिसत आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात जिल्ह्यात मोर्चे काढून महायुती सरकारला धारेवर धरणाऱ्या विद्या गाडेकर यांनी आता शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करण्याची मागणी शेवगाव-पाथर्डी मतदार संघात फलक लावून केली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी एका महिला मुख्यमंत्र्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे. प्रतिभा पवार यांना महिला मुख्यमंत्री करावे या मागणीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण प्रतिभा पावरांचे नाव जर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आल्यास त्याला कोणी विरोध करणार नाही.अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.