TIMES OF AHMEDNAGAR
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आयोजकांकडून आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे. खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही असं उत्तर आझाद मैदान पोलिसांनी आयोजकांना दिलं आहे.
आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी आयोजकांना सांगितलं आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे.



