अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो मंजूर व्हावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनचे पदाधिकारी सलग नऊ दिवस अहमदनगर महानगर पालिकेसमोर उपोषणाला बसले होते. राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला आणि आदेशाचे पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आज पदाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आले. यावेळी युनियनच्या वतीने आ.जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंदराव वायकर, बाबासाहेब राशीनकर, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़,अजय सौदे, प्रफुल लोंढे, अजित तारु, अंतवन क्षेत्रे, विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी,अनंत लोखंडे, भास्कर अकूबत्तीन, अकील सय्यद,सखाराम पवार, महादेव कोतकर,अमोल लहारे दिपक मोहिते आर.ए देशमुख आदी उपस्थित होते.
(संग्रहित दृश्य.)
आमदार संग्राम जगताप यांनी सातवा वेतनचा प्रश्न मार्गी लावला.
अहमदनगर महानगरपालिकेमध्ये कमी वयामध्ये नगरसेवक महापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली आणि अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याची हातोटी आली. त्यामुळेच मी आमदारकीच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासाला चालला देऊ शकलो. मनपा कर्मचारी यांनी नेहमीच संकट काळामध्ये नगरकरांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा हे माझे कर्तव्य होते आणि ते मी पूर्ण करू शकलो याचा मला मनस्वी आनंद आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
(संग्रहित दृश्य.)
मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करून पगार दिले जातील.
महानगर पालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आ. संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे तो मंजूर झाला आहे. आता मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल अनेक वर्षाच्या पाठपुराव्याला आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे यश आले असल्याचे मत युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मंजूर केला असून सुधारित वेतन श्रेणी दि. १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन दि. १ सप्टेबर २०१९ पासून देण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे तरी लवकरात लवकर मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करून पगार दिले जातील असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले.