TIMES OF AHMEDNAGAR
टाइम्स ऑफ अहमदनगरने (TIMES OF AHMEDNAGAR) सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी. तीन वाजून तेहतीस मिनिटाला (३:३३ वाजता) कॅफेमध्ये चालणाऱ्या अश्लील कामांबद्दल बातमी प्रसिद्ध केली होती. यामध्ये निर्भीडपणे शहरातील सर्वच कॅफेची सत्यता मांडण्यात आली होती. तरुणाईला बिघडवाऱ्या कॅफे चालकांना थेट सवाल करत टाइम्स ऑफ अहमदनगरने (TIMES OF AHMEDNAGAR) अश्लील कामांना प्राधान्य न देण्याचे स्पष्ट केले होते. टाइम्स ऑफ अहमदनगरने (TIMES OF AHMEDNAGAR) सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी. तीन वाजून तेहतीस मिनिटाला (३:३३ वाजता) बातमी प्रसिद्ध करताच पोलिसांनी संबंधित कॅफेंवर छापे टाकले आणि अश्लील कामांना प्रोत्साहन देणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. निर्भीडपणे सत्यता मांडणाऱ्या टाइम्स ऑफ अहमदनगरचे (TIMES OF AHMEDNAGAR) शहरातून तोंडभरून कौतुक झाले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
अहमदनगर शहरातील अवैध धंद्यांना सध्या उत आला आहे. शॉर्टकटने पैसे कमावून लवकर यशस्वी होण्याचे स्वप्नच जणू तरुणाईने पाहिले असावे. सुगंधित तंबाखू,मटका,जुगार,अवैध दारू विक्री,महाराष्ट्रात बंदी असलेली हिरा गुटखा,विमल आणि आता कॅफेमध्ये अश्लील कामांना जागा अशा अनेक अवैध धंद्यांमध्ये तरूणाई जास्त आकर्षित होत आहे. लवकर यशस्वी होण्याचे स्वप्न तरुणाईला अवैध धंद्यांकडे खेचत असले तरी प्रत्येक कामाला गॉडफादर पाठीशी असावा लागतो. या कॅफेंच्या मालकांच्या पाठीशी देखील असाच एक गॉडफादर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
होता रोहित म्हणून वाचला मोहित ?
शहरातील एक व्यक्ती लक्ष्मी दर्शन घेऊन कॅफे चालकांना संरक्षण देत आहे.कॅफे चालकांच्या चर्चेतून त्याचे नाव बॉडीगार्ड मोहित असल्याचे समजते. थोडंस दर्शन तो त्याच्या बॉसला देखील देत असतो. बॉसच्या आशीर्वादाने तो धिंगाणा,धिंगाणा, कॅफेंचा धिंगाणा करत आपली दहशत कॅफेंवर करत आहे.जो कॅफेचालक बॉडीगार्ड मोहितला लक्ष्मी दर्शन देणार नाही त्याच कॅफे चालकांवर कारवाई केली जाते. काल स्थानिक गुन्हे शाखेने काही कॅफेंवर छापे टाकले.मात्र या मोहितने अनेक कॅफे चालकांना सावध केल्याचे स्थानिक प्रसिद्धी माध्यमांच्या प्रसिद्ध झालेल्या बातमी मधून पाहायला मिळते.काहींनी मोहितला जाब विचारला कि आम्ही तर पाकीट पोहोच केले आहेत मग आमच्यावर का ? मोहितने त्यांना आपला सहभाग नसल्याचे सांगत इतर यंत्रणेला जबाबदार धरण्याचा सल्ला दिला.
जगात कॅफे कशे आणि अहमदनगरला कशे ?
शाळा / कॉलेजला जाण्याचे कारण देऊन काही मुली घराच्या बाहेर पडता. आई-वडील देखील या मुलींवर विश्वास करत त्यांना परवानगी देतात. मात्र या अघाऊ मुली कोणत्याही शैक्षणिक शाळा / कोलेजला न जाता कॅफेंमध्ये अश्लील कामांचे धडे गिरवत असल्याचे चित्र पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.जगातले कॅफे हे चहा ,कॉफी ,नाष्टा यासाठी प्रसिद्ध आहेत.दैनंदिन कामकाजात थोडासा बदल हवा यासाठी अनेकांची कॅफेंमध्ये गर्दी असते.आणि ते कॅफे मोकळे असतात.मात्र अहमदनगर शहरातल्या कॅफेंनी सर्वच सीमा ओलांडल्या आहेत. या कॅफेंमध्ये चहा,कॉफिंचे घोट न घेता. तरूणाई “दो बुंद प्यार के” घेत असल्याची मिश्कील टीका काही नगरकरांनी खासगीत केली असल्याचे समजते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
स्थानिक गुन्हेशाखेचे यश कि तोफखाना पोलिसांचे अपयश ?
शहरात काल काही मोजक्या कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला.यामध्ये स्थानिक गुन्हेशाखेचे यश मानायचे कि तोफखाना पोलिसांचे अपयश हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थानिक गुन्हे शाखेने काही कॅफेंवर छापा टाकून काही तरुणांना ताब्यात घेतले.त्यांची खात्री करून त्यांना सोडून दिले.मात्र तोफखाना हद्दीत साधारणता २५ ते ३० कॅफे असल्याचे बोलले जाते.या कॅफेंमध्ये अश्लील कृत्य होतात. प्रसिद्धी पुरते कॅफेंवर कारवाई होते. मात्र नंतर या कॅफेंवर कोणताही धाक राहत नाही.कॅफेंवर कारवाई झाली मात्र या कॅफे चालकांना कोणाचा आशीर्वाद आहे. कॅफे चालक कोणाच्या संरक्षणावर एवढी मोठी हिम्मत करत आहेत हे देखील स्थानिक गुन्हे शाखेने शोधावे अशी इच्छा नगरकर व्यक्त करत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कोण आहे बॉडीगार्ड मोहित उद्याच्या सत्रात.