खासदार निलेश लंके यांचे संसदभवन मध्ये पहिले पावूल, सर्वसामान्यांचे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे मानले आभार.
TIMES OF AHMEDNAGAR | DELHI | PARLIAMENT HOUSE | MP NILESH LANKE | MAHAVIKAS AGHADI | MP NILESH LANKE THANKED ALL THE LEADERS OF MAHAVIKAS AGHADI WHILE TAKING OATH IN DELHI THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

यामागे केवळ सर्वसामान्य माणसाचा माझ्यावर असणारा विश्वास, त्यांचे प्रेम आणि माया आहे याची मला जाणीव आहे.माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण केवळ लोकसेवेसाठी आहे. माझ्यावर माझ्या माणसांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत असेन हा शब्द यानिमित्ताने देतो.आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब,खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे. याबद्दल या सर्वांचे मनापासून आभार. माझ्या विजयासाठी रात्रीचा दिवस करणारे माझे सहकारी, कार्यकर्ते , महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आदी सर्वांचे माझ्यावर प्रेमाचं ॠण आहे. त्यातून उतराई होण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment