व्यापाऱ्यांना अस्थापना शुल्क कर लागू करण्यावरून शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) आमने-सामने.
आज अहमदनगर महानगर पालिका,अहमदनगरची महासभा पार पडली अनेक विषयांना शस्त्र बनवून वरिष्ठ व कनिष्ठ नगरसेवक एकमेकांच्या प्रश्नांवर भिडले. अहमदनगर शहरात मागील अनेक दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या आडीअडचणी शहारतील अनेक नेते मंडळी मांडत आहेत.काही अडचणींना मांडण्यासाठी शहरातील नेते सक्षम नसल्याचे कारण देत शहरातील स्वयंघोषित भाईलोकांनी जिल्ह्याच्या बाहेर जाऊन जिल्ह्याबाहेरील नेत्यांना आपले दुखणे सांगणे पसंत केले होते. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी कॉग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी देखील अहमदनगर महानगर पालिकेवर धडक मोर्चा धड्कावला होता.महानगर पालिकेत अस्थापना शुल्क कर लागू करण्यात यावा यासाठी माजी.सभापती कुमार वाकळे यांनी आपली बाजू मांडली ,तर व्यापाऱ्यांवर असला कर लागू करू नये यासाठी नगरसेवक बाळासाहेब बोराटे देखील संतापून उभे राहिले.
नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि कुमार वाकळे भिडले.
सतत व्यापाऱ्यांच्या बाजूने आपला यल्गार पुकारणारे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पुन्हा व्यापाऱ्यांच्या अस्थापना शुल्क करा वरून महानगर पालिकेच्या महासभेला डोक्यावर घेतले होते. उद्योग हे शहर विकासाच्या रथाचे दोन चाकं आहेत. यावर अनेक छोटे-मोठे लघुउद्योजक, व्यापाराशी निगडित घटक, कामगार, कष्टकरी अवलंबून आहेत. नगर शहराला विकसित करायचे असेल तर उद्योग व व्यापाराला चालना मिळण्याची गरज आहे. मात्र या दोन्ही मुख्य घटकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अहमदनगर महानगर पालिकेने कधीही विशेष प्रयत्न केलेले नाहीत.व्यापाऱ्यांना सुविधा देण्यासाठी असमर्थ असलेली महानगर पालिका हि देशातील पहिली महानगर पालिका असल्याचे आरोप करत. व्यापाऱ्यांना कोणतेही फालतू कर लाऊन व्यापाऱ्यांच्या संयमाशी महापालिकेने खेळू नये.कुठल्याही प्रकारे अस्थापन शुल्क कर व्यापाऱ्यांवर लादू नये असेही बोराटे म्हणाले.
कुमार वाकळे यांनी भूमिका काय ? :
आम्ही सतत व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत,असा देखावा करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट ) चे कुमार वाकळे यांनी व्यापाऱ्यांना आज जोरका झटका दिला आहे. अहमदनगर महानगर पालिका व्यापाऱ्यांना सर्वच सुविधा देत आहे.महानगर पालिकेचे पथदिवे व्यापारी वापरतात,महानगर पालिकेच्या चेंबरचा वापर व्यापारी करत असतात त्यामुळे व्यापाऱ्यांवर अस्थापना कर लावणे चुकीचे ठरणार नाही असे माजी.सभापती कुमार वाकळे म्हणाले.कर लागू होऊ नये यासाठी व्यापारी वर्गाने अनेक वेळेस निवेदनातून आपली विरोधाची भूमिका मंडळी होती. परंतु माजी.सभापती वाकळे यांनी अस्थापना कर लागू करण्याच्या सूचना सभागृहात मांडल्या आहेत.येत्या महिन्यापासून महानगर पालिकेवर प्रशासक राज सुरु होणार आहे.प्रशासक राज्यात व्यापाऱ्यांना जर अस्थापना शुल्क कर लागू झाला तर याचे श्रेय कुमार वाकळेंना भेटेल असा आत्मविश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.