Reading:भर उन्हात कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून लंकेंनी साध्या पद्धतीने दाखल केला उमेदवारी अर्ज… म्हणाले हा बळाचा वापर करणारच आहे.आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा वापर केला जाणार आहे.
भर उन्हात कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून लंकेंनी साध्या पद्धतीने दाखल केला उमेदवारी अर्ज… म्हणाले हा बळाचा वापर करणारच आहे.आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा वापर केला जाणार आहे.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MAHARASHTRA | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | SOUTH LOK SABHA CONSTITUENCY | SUJAY VIKHE | NILESH LANKA | BJP | NATIONALIST CONGRESS PARTY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल सुजय विखे यांनी काल सोमवार (२२ एप्रिल) अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर विखेंच्या विरोधात शरद पवार गटाकडून (महाविकास आघाडी) माजी.आमदार निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र निलेश लंके यांनी आज मंगळवार ( २३ एप्रिल )आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिव्यांग बांधवाच्या हस्ते निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठी रॅली न काढता साधेपणाने निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांनी सर्वांची मने जिंकली आहे. निलेश लंकेंचे मतदारसंघातून कौतुक केले जात आहे.
काल सोमवार (२२ एप्रिल) सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. विखेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात दाखल झाले होते. मतदार संघातले आपले वजन दाखवण्यासाठी विखेंच्या यंत्रणेकडून मोठे नियोजन करण्यात आले होते. या वेळी विखेंच्या यंत्रणेने काही भाडोत्री माणसे जमा केली होती तर काही लोकांची रोजंदारी दिली नसल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. तर विखेंचे प्रतिस्पर्धी निलेश लंके यांनी आज मंगळवार ( २३ एप्रिल ) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज हनुमान जयंती असल्याने सर्वत्र हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहेत. तसेच कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपण रॅली न काढता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हनुमानाने मला निवडणूक लढवण्याचे बळ द्यावे. असे यावेळी लंके म्हणाले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक – निलेश लंके
आज हनुमान जयंती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आहेत. आपला अर्ज भरतांना आपण लोकांना वेठीस धरायचं यापेक्षा आपण आपला अर्ज शांततेने भरला पाहिजे. समाजाला अडचण होईल अस नाही करायचे, मला लोकं जमा करावे लागतात काय ? लोकं जमा करायला मला काय भाडे द्यावे लागते का ? मला काय लोकं विकत आणावे लागतात का ? आपण लोकांना आवाहन केले असते तरी देखील लोकं आले असते असे म्हणत लंकेंनी पुन्हा एकदा विखेंना डवचले आहे. हा बळाचा वापर करणारच आहे.आर्थिक ताकतीचा वापर सत्तेचा वापर केला जाणार आहे. असे म्हणत लंकेंनी विखेंना आरसा दाखवला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
राणी लंके मैदानात.
निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी निलेश लंके विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जनतेला सांगण्यासाठी विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे विरोधक आता खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. अहमदनगर येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा अर्ज भरण्याआधी झालेल्या जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंकेचे दहन करा, असे भाषणामध्ये बोलताना मतदारांना सांगितले होते. मात्र निलेश लंके हे निवडणुकीला उभे राहिले असल्यामुळे विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते आमच्यावर टीका करत असल्याचे राणी लंके यांनी म्हटले आहे.