TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | COLLECTOR SIDDHARAM SALIMATH | BHUIKOT FORT AHMEDNAGAR | MLA SANGRAM JAGTAP | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहराच्या वैभवात भर पडावी आणि शहराची विकासाकडे वाटचाल व्हावी, शहरात पर्यटकांचा टप्पा वाढावा यासाठी अनेक नेत्यांकडून भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरण आणि विकासात घर घालण्यासाठी धावपळ केली जाते. सुप्रिया सुळे शहराच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी देखील भुईकोट किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील भुईकोट किल्ला हा पर्यटकांसाठी खुला करून देण्याची मागणी केली होती.
सिद्धराम सालीमठ जिल्हाधिकारी,अहमदनगर
किल्ला विकासाच्या ९५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आता मान्यता.
अहमदनगर शहराच्या वैभवात भर पाडण्यासाठी भुईकोट किल्ला हा महत्वाचा भाग म्हणून पहिला जातो. या भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी आता केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांशी बैठक झाली आहे. एका खासगी कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी हि माहिती दिली आहे. यावेळी सालीमठ बोलत होते. ते म्हणाले केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांबरोबर बैठक होऊन त्यात किल्ला विकासाच्या ९५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आता मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारमार्फत यासंदर्भातील सामंजस्य कराराचाही पहिला टप्पा झाला आहे व येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.